Breaking News

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी आणि संबधितांची मालमत्ता ईडीकडून जप्त अलिबाग आणि दादर मधील ९ मालमलत्तांचा समावेश

मागील काही दिवसांपासून शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई होणार होणार अशी राजकिय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यानुसार आज ईडीने पत्रावाला चाळ पुनर्विकास प्रकल्प प्रकरणी कारवाई करत अलिबाग, पालघर आणि दादर येथील मालमत्ता जप्त केली.
दादर येथील संजय राऊत हे रहात असलेली सदनिका ही संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावे आहे. तसेच स्वप्ना पाटकर आणि वर्षा राऊत यांच्या मालकीचे ८ भूखंड अलिबाग येथे असून हे भूखंडही ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रवीण राऊत यांच्या मालकीची पालघर येथील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने केलेल्या कारवाईत जवळपास ११ कोटी रूपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. तसेच ही कारवाई पत्रावाला चाळ पुनर्विकास प्रकल्पाशी संबधित प्रकरणी करण्यात आल्याचा खुलासाहीही ईडीने आपल्या ट्विटमध्ये केला आहे.
संजय राऊत यांच्या सर्व मालमत्तांची किंमत एक हजार ३४ कोटी इतकी होत असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगली आहे. तसेच यात दादर येथील राहत्या घरांपासूनचा समावेश असल्याची माहिती पुढे आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही यासंदर्भात यापूर्वीच संजय राऊत यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे ईडी आता शिवसेना नेत्यांच्या घरापर्यंत पोहचल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणात चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. तसेच पत्रावाला चाळ प्रकरणातही त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्या मुलीचे लग्न झाल्यानंतर लग्नावर झालेल्या खर्चाच्या तपशीलाची माहितीही ईडीकडून घेण्यात येत होती. यासंदर्भातील खुलासा दस्तुरखुद्द संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितली होती.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *