Breaking News

उदय सामंत यांचे हल्लेखोरांना आव्हान, तारीख आणि वार देतो… पुण्यातील हल्ल्यानंतर जाहिर सभा घेणार असल्याचे केले जाहिर

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या भागात जाणाऱ्या माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यानंतर सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावरही सदर घटनेची माहिती घातली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अंगावर आले तर शिंगावर घ्या असा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी हल्लेखोरांना आव्हान देत म्हणाले, कात्रज चौकात लवकरच माजी जाहीर सभा होत आहे. त्यामुळे मागून हल्ला करण्यापेक्षा हिंमत असेल तर समोरून हल्ला करा, मी तारीख आणि वार देतो असे खुले आव्हान दिले.

मी मुंबईला असताना पुण्यातील काही पदाधिकारी मला भेटायला आले होते. त्यांना माझा सत्कार घ्यायचा होता. तेंव्हा मी त्यांना सांगितले की जर तुम्हाला पुण्यात माझा सत्कार घ्यायचा असेल, तर तो कात्रजच्या चौकात घ्या, त्यामुळे मी लवकरच कात्रज चौकात जाहीर सभेला संबोधित करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

तसेच मागून वार करण्यापेक्षा मी कार्यक्रमाची तारीख आणि वार देतो, असे आवाहनही त्यांनी हल्ला करणाऱ्यांना केले आहे.

पुण्यात राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर १० ते १२ जणांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली होती. आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज चौकात हा हल्ला झाला होता. आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर तेथून उदय सामंत ताफा जात होता. यावेळी सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. या प्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, हिंगोलीचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, राजेश पळसकर, संभाजी थोरवे, सूरज लोखंडे, चंदन साळुंके यांना अटक करण्यात होती. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, त्यावेळी पुणे दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासोबत उदय सामंत हे होते. मात्र मध्येच त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा सोडून दुसरीकडे निघून गेले. तसेच त्यांनी जाणीवपूर्वक आदित्य ठाकरे यांची सभा असलेल्या कात्रज भागात गेल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *