Breaking News

शिवसेनेची बंडखोर आमदारांवर कारवाई तर एकनाथ शिंदे म्हणाले, घाबरू शकत नाही एकनाथ शिंदेचे शिवसेनेला प्रत्युत्तर

शिवसेनेतील नंबर दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकाविला. त्यानंतर आता शिंदे यांनी आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा करण्यास सुरुवात केली असून त्यादृष्टीने विधिमंडळाशी पत्र व्यवहार सुरु केला. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून समेट घडवून आण्याचे प्रयत्न सुरु केलेले असतानाही या बंडखोर आमदारांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच आज शिवसेनेने बोलाविलेल्या बैठकीला हजर राहीले नसल्याने बंडखोर असलेल्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई केली असून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी विधानसभेत प्रस्ताव दिल्याची माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

मागील तीन दिवसांपासून राज्यात सुरु झालेल्या या बंडखोरीला क्षमविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रयत्न सुरु केले. सुरुवातीला त्यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले. त्यानंतर स्वत: मुख्यमंत्री ठाकरे हे शिंदे यांच्याशी बोलले. मात्र एकनाथ शिंदे हे परत येण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट झाले. तर दुसऱ्याबाजूला एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीला जावून त्यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येवू लागले. यापार्श्वभूमीवर आज शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना २४ तासाच्या आत परतण्याचे आवाहन केले. तसेच तुमचे म्हणणे काय आहे ते पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासमोर मांडा महाविकास आघाडीतून बाहेर पडू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. अखेर बंडखोर आमदार परत न आल्याने शिवसेनेने १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

या १२ आमदारांमध्ये अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत यांच्यासह अन्य जणांचा समावेश आहे.

शिवसेनेने केलेल्या कारवाईवर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत शिवसेनेला पुन्हा एकदा हिट बॅक दिला असून कोणाला घाबरवताय. तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हाला कळतो. घटनेच्या १० व्या परिशिष्टानुसार व्हिप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो. बेठकीसाठी नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे असंख्य निकाल आहेत. १२ आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व शिवसैनिक आहोत असे प्रत्युत्तर दिले आहे.

Check Also

छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *