Breaking News

कोळशाच्या संकटावर अजित पवार म्हणाले, तर छत्तीसगड मध्ये खाणच विकत घेवू वीजेचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारच्या कामाची दिली माहिती

मागील काही दिवसांपासून कोळशाचा अपुरा पुरवठा आणि खाजगी वीज कंपन्यांकडून कमी प्रमाणात होत असलेला वीज पुरवठा या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु असून याचाच भाग म्हणून छत्तीसगडमधील खाण घेण्याची तयारी सुरु आहे. तसेच परदेशातून देखील कोळसा आयात करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
पुण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अजित पवारांनी वरील माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह नितीन राऊत यांनी लोडशेडिंगच्या परिस्थितीचा आढावा घेतला असल्याची माहिती दिली.
सुरळीत वीज पुरवठा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. देशपातळीवर कोळशाचा तुटवडा आहे. महाराष्ट्र सरकार छत्तीसगडमधील कोळशाची खाण घेण्याचा विचार करत आहे. नितीन राऊत त्यासाठी प्रयत्न करत आहेत. छत्तीसगडमधील सरकार काँग्रेसच्या विचारांचं असून सोनिया गांधींनी त्यासंबंधी सरकारला सांगितलं आहे. त्याचबरोबर परदेशातून देखील कोळसा आयात करण्यात येणार असल्याचे सांगत त्यासंबंधी निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर विचारले असता ते थोडेसे संतापून म्हणाले की, माझं नेहमी स्पष्ट मत असतं आणि तुम्हा सर्व मीडियाला माहिती आहे. तुम्ही नेहमी मला असले प्रश्न विचारत असता की याने असं वक्तव्य केलं त्याबद्दल तुमचं मत काय आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अवमान होणार नाही तसंच नाराजी वाढणार नाही याचं तारतम्य ठेवूनच वक्तव्यं केली पाहिजेत.
याबरोबरच काही पोलिस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांना स्थगिती देण्यात आल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी यासंबंधी निर्णय घेतला होता. तो त्यांचा अधिकार आहे. कमिटी शिफारस करते. त्यानुसार निर्णय होतो. काहींना स्थगिती दिली असं आज मी वाचलं आहे. मुंबईत जाऊन जोपर्यंत मी याबद्दल माहिती घेत नाही तोवर काही सांगू शकत नसल्याचेही याप्रश्नी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
२२१ कोटींचा नागरी सहकारी बँकांचा घोटाळा समोर आणण्याचे काम मीडियाने केले. पण साडे तीन हजारापेक्षा जास्त ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांचा ६७ हजार कोटींचा घोटाळा याच काळात झाला. ते प्रमाण एकूण घोटाळ्याच्या ९० टक्के आहे आणि नागरी सहकारी बँकांचं प्रमाण पाव टक्का आहे. पण मी कुणाचं समर्थन करत नाही. कोणत्याही प्रकारच्या बँका असल्या तरी त्यांनी जनतेचा पैसा सुरक्षितच ठेवला पाहिजे. कर्ज बुडवणार नाही अशा नेत्यांनाच ते दिलं पाहिजे असेही ते म्हणाले.
याशिवाय मंत्र्यांच्या खाजगी रूग्णालयातील उपचाराबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी खासगी रुग्णालयात गेलो तेव्हा मीच बिल भरलं होतं. ज्या मंत्र्याने घेतलं त्याला विचारा. तू का असं केलं. मंत्री असताना सरकारचा पैसा खर्च करण्याऐवजी स्वत:चा पैसा खर्च करायला हवा होता असे स्पष्ट मतही त्यांनी याबाबत व्यक्त केले.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *