Breaking News

अजित पवार यांनी दिले, “त्या” लोकप्रतिनिधी आणि गुंडावर कारवाईचे आदेश सातारा दौऱ्यात पोलिस अधिक्षकांना केला व्हिडिओ सुपुर्द

मला आत्ता एक क्लिप मिळाली. त्यानंतर मी ताबडतोब पोलीस अधीक्षकांना बोलावलं. मी अभयसिंग जगताप यांच्या घरात जेवायला थांबलो होतो. तेव्हा पोलीस अधीक्षकांना ती क्लिप दाखवली. तसेच संबंधितांना बोलावून ठेकेदाराचं काही चुकत असेल तर त्याला समजाऊन सांगण्यास सांगितलं. मात्र, लोकप्रतिनिधींच्या नावावर कुणी चुकीचं काम करत असेल तर ते खपवून घेऊ नका, तसेच त्या गुंडाना लोकप्रतिनिधी पाठीशी घालत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलिसांना सांगितले असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर अजित पवार हे आले असून या दौऱ्यात त्यांना एका व्यक्तीने व्हिडिओ क्लिप पाठवून दिली. त्यानंतर त्यांनी वरील आदेश दिल्याचे सांगितले.

दुर्दैवाने महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात विकास कामांमध्ये अडथळे निर्माण केले जात आहेत. मध्यंतरी नितीन गडकरी यांनी देखील मुख्यमंत्र्यांसह आम्हा सर्वांकडे तक्रार केली होती. महाराष्ट्रात काही भागात काही लोकप्रतिनिधी चुकीचं वागत आहेत. त्यामुळे तेथील कामात अडचणी येत आहेत. ठेकेदार आम्हाला तेथे काम करायचं नाही असं म्हणतात. तेच माझ्या टेंभुर्णे ते साताराच्या कामात घडलं आहे. तिथं ठेकेदाराला त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

बारामतीत उद्योग मालकाने फोन करून लोकं अडचणी निर्माण करतात असं सांगितलं, तर तो माझा घरातील असो किंवा राष्ट्रवादीचा असो आम्ही पोलिसांना कारवाई करण्यास सांगतो. उद्योगांसाठी चांगलं वातावरण असलं पाहिजे. उद्योगपतीला देखील आपण लावलेला पैसा परत मिळेल, बँकेचे हप्ते परत जाणार आहेत हा विश्वास मिळाला पाहिजे असेही ते म्हणाले.

मला गावात काही लोकांनी थांबवलं, हार घातला आणि शुभेच्छा देताना म्हणायचे आता रस्ता बघा कसा आहे. मी म्हटलं बरं बाबा बघतो, ते माझं कामच आहे. सातारकरांनो लोकप्रतिनिधींनी नीट कामं केली तरच विकास होतो. काही अडचण आली तर ठेकेदाराला मदत करायची असते. पुण्यात रांजणगाव, इंदापूर, बारामती, सडसवाडी, तळेगाव, चाकण, जेजुरी, सासवड अशा अनेक ठिकाणी एमआयडीसी झाली. तिथं कोणी उद्योगपतीच्या विकास कामात आड आलं तर आम्ही अडथळा आणणारा आमच्या जवळचा आहे की लांबचा आहे हे बघत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सातारा एमआयडीसीचा विकास टक्केवारीसाठी रोखणाऱ्या आणि खंडणीखोर गुंडांना पाठीशी घालणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याचे आदेश सातारा पोलिस प्रमुखांना दिले आहेत. एक व्हिडीओ क्लिप मिळाली. त्यानंतर अजित पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना व्हिडीओ दाखवत हे आदेश दिले. यावेळी त्यांनी लोक प्रतिनिधींच्या नावावर कोण चुकीचे काम करत असेल तर ते खपवून घेऊ नका, असे स्पष्ट निर्देशही दिले.

Check Also

एमआयएमचा पाठिंबा, त्यावर भाजपाची टीका तर भास्कर जाधवांचे प्रत्युत्तर भाजपाची बी टीम, सी टीम कोण अख्ख्या देशाने पाहिलंय

राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अखेर एमआयएमने आपल्या दोन आमदारांचा पाठिंबा अखेर काँग्रेसला जाहिर केला. तत्पूर्वी एमआयएमने …

Leave a Reply

Your email address will not be published.