Breaking News

अजित पवारांचा राज्यमंत्री भरणेंना चिमटा, पण मी वाढपी म्हणून एक पळी जास्तच वाढेन आपल्याच मंत्र्यांला अर्थमंत्री पदाची करून दिली आठवण

आपल्या रोखठोक बोलण्यामुळे कधी टीकेचे तर कधी हास्यकल्लोळाचे धनी होणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्याच पक्षाच्या राज्यमंत्र्याला आपल्याच पदाची आठवण करून दिल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हस्यकल्लोळ उडाला. पुरंदर तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस या वातानुकूलित नुतन वास्तूच्या उद्घाटन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री दत्ता भरणे आणि उपमुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमात अजित पवार हे बोलण्यास उभे राहीले आणि म्हणाले की, दत्ता भरणे हे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आहेत. मागील महिन्यात सर्वाधिक निधी इंदापूर तालुक्याला देत आहेत. आम्हालाही त्यांना सांगावे लागते इकडे जरा बारामतीलाही निधी द्या म्हणून. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहेत. मात्र त्यांना माहिती नाही राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत, जर मीच निधी नाही दिला तर… असे सांगत उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला.

अजित पवारांनी जरी मिश्किलपणे टीपण्णी करत राज्यमंत्री भरणे यांना चिमटा काढलेला असला तरी अजित पवारांनी त्यांना गर्भित इशारा तर दिला नाही ना? अशी चर्चाही स्थानिक कार्यक्रमात रंगली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्ता भरणे यांच्या विभागातून इंदापूर तालुक्‍यातील सर्वाधिक निधी दिला जात आहे. आम्हालाच मामांना विनंती करावी लागते की, बारामतीला देखील काही निधी द्या. बांधकाम विभागाच्या चाव्या त्यांच्या ताब्यात आहेत. पण त्यांना माहीत नाही, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत”, असे अजित पवार म्हणाले.

“मी तिजोरी उघडली आणि बांधकामाला पैसे दिले तरच ते देणार, नाहीतर काय देणार **…?” असेही अजित पवार म्हणाले. यावर आता गाडी घसरायला लागलीय त्यामुळे थांबतो, असं म्हणत त्यांनी आपले भाषण संपवले.

यावेळी मी निधी वाटपाच्या संदर्भात मुंबईत गेल्यावर आपल्या इथेही निधी देण्याचे काम करणार आहे. तुम्ही अजिबात शंका बाळगू नका. वाढत्या उंचीचा असल्याने आपल्या जवळच्या लोकांच्या ताटात जरा जास्तचं पडत असतं हे तुम्हाला माहितीच आहे असे सूचक वक्तव्य करत मी जेव्हा हे वाढपी म्हणून वाढणार आहे त्यावेळी सगळ्यांनाच देण्याचा प्रयत्न करेन. पण बारामती आणि निंबूतला एक पळी जास्त वाढेन एवढी नोंद घ्यावी अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

Check Also

मंत्री तानाजी सावंत म्हणाले, आम्हाला मागील तोटा भरून काढायचाय सोलापूरातील सभेत बोलताना केली घोषणा

शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारची स्थापन होऊन ६० दिवस झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published.