Breaking News

विधान भवन पासून हाकेच्या अंतरावर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला मात्र १५ टक्के भाजला

विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असताना सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना विधान भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आयनॉक्स थिएटर समोर उस्मानाबादचे सुभाष भानुदास देशमुख या शेतकऱ्याने अंगावर रॉकेल टाकत स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवत देशमुख यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान देशमुख हे १५ टक्के भाजल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनास्थळी दाखल पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. विधान भवनाच्या बाहेर दुपारच्या सुमारास सुभाष देशमुख नावाच्या शेतकऱ्याने जाळून घेण्याचा प्रयत्न केला.

जमिनीच्या वादातून त्यांनी जाळून घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सुभाष देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी आहे. आज दुपारी विधान भवनाच्या शेजारीच असलेल्या आयनॉक्स सिनेमागृहासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेतली आणि त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. या घटनेमध्ये देशमुख हे जखमी झाले असून त्यांचा हात भाजला आहे.

जमिनीवरून सुभाष देशमुख आणि त्यांच्या भावामध्ये वाद होता. या वादातून त्यांच्या वडिलांनीही जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने ते यात वाचले. दरम्यान, आज शेतकरी सुभाष देशमुख यांनी जाळून घेतल्याने ते १२-२० टक्के भाजले असल्याची माहिती सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, जो काही विषय असेल त्यात लक्ष घालून सोडवला जाईल, याबाबत मी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याची माहिती विधानसभेत दिली.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *