Breaking News

रायगडमधील महामुंबईसाठी घेतलेल्या जमिनीवरील सुनावण्या परत करणार जमिनींची सुनावणी तीन महिन्यात पुर्ण करणार-उद्योग मंत्री

काही वर्षांपूर्वी महामुंबई सेजसाठी रायगड जिल्हयातील उरण, पनवेल, पेण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आलेल्या होत्या. मात्र जनक्षोभाच्या रेट्यापुढे हा प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकार आणि रिलायन्स कंपनीवर आली. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याचा निर्णय झाला असून त्यावर सध्या सुनावणी घेण्यात येत आहे. या सुनावण्या कधीपर्यंत संपविणार असा प्रश्न भाजपाचे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी उपस्थित केला असता या सुनावण्या तीन महिन्यात पूर्ण करणार असल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

विधानसभेत तारांकीत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान यावरील चर्चे दरम्यान उद्योग मंत्र्यांनी वरील उत्तर दिले.

महामुंबई सेझ कंपनीसाठी उरण पेण, पनवेल तालुक्यातील १५०४ हेक्टर जमिन शासनाने संपादीत केली होती. प्रत्यक्ष प्रकल्प न झाल्याने सदरची जमिन शेतक-यांना परत करण्यात यावी अशी मागणी शेतक-यांकडून करण्यात येत आहे. मात्र त्याला विलंब होत असल्याकडे लक्ष वेधत आमदार ॲड आशिष शेलार यांनी शासन सदर जमिनी परत करण्यास का विलंब करीत आहे असा प्रश्न उपस्थित केला.

त्यावर उत्तर देताना उद्योग मंत्र्यांनी सांगितले की, याबाबत जिल्हाधिका-यांकडे सुनावणी सुरू असून लवकरात लवकर ही कार्यवाही पुर्ण करण्यात येईल. त्यावर ही सुनावणी कधी पुर्ण होणार असा प्रश्न आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला त्यावर उत्तर देताना उद्योग मंत्र्यांनी तीन महिन्यात सुनावणी पुर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. या चर्चेत सहभागी होताना आमदार महेश बालदे यांनी याबाबत स्थानिक लोकप्रतिनींची बैठक घ्यावी अशी मागणीही केली.

Check Also

नौदलाच्या नव्या झेंड्यावर छत्रपतींच्या राजमुद्रेची छटाः मुख्यंमत्री, उपमुख्यमंत्री म्हणाले… शिवाजी महाराजांना अभिवादन असल्याचे व्यक्त केले मत

संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज …

Leave a Reply

Your email address will not be published.