Breaking News

राहुल गांधी म्हणाले, तुम्हाला आठवतेय का? मोदी तरूणपणी मगरीशी भिडले होते हिंदू म्हणजे नेमके काय सांगतो म्हणत पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

मराठी ई-बातम्या टीम

हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातला फरक स्पष्ट करताना राहुल गांधी म्हणाले, महात्मा गांधींनी त्यांचं पूर्ण आयुष्य सत्य समजून घेण्यात घालवलं, तर दुसरीकडे गोडसे हा हिंदुत्ववादी होता. गोडसेला कुणीही महात्मा म्हणत नाही, कारण त्याने एका अशा हिंदूची हत्या केली, जे नेहमी सत्य बोलायचे. गोडसे हा घाबरट होता. एक कमकुवत माणूस होता. तो त्याच्या भितीचा सामना करू शकला नसल्याचे सांगितले.

मी तुम्हाला हिंदू म्हणजे काय ते सांगतो. हिंदू म्हणजे अशी व्यक्ती, जी फक्त सत्याच्या मार्गावर मार्गक्रमण करते, जी व्यक्ती कधीच घाबरत नाही, निडर असते आणि जी व्यक्ती कधीच तिच्या भितीचं रुपांतर हिंसा किंवा द्वेष किंवा रागात करत नाही. त्याचं सर्वोत्तम उदाहरण महात्मा गांधी आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगून टाकले.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या हिंदू आणि हिंदुत्व या शब्दांवरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. हिंदू आणि हिंदुत्व वेगवेगळे आहेत की एकच आहेत, यावर वाद सुरू आहे. यासंदर्भात आज राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये घेतलेल्या सभेत स्पष्टीकरण देत या मुद्द्यावरून भाजपावर परखड टीका करतानाच महात्मा गांधींना हिंदू असल्याचं सर्वात मोठं उदाहरण असल्याचे जाहीर केले, यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या भगिनी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी देखील होत्या.

दरम्यान, राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या गंगा स्नानावर निशाणा साधत म्हणाले की मी पहिल्यांदाच असे पाहिले की, फक्त एक व्यक्ती गंगेमध्ये स्नान करत आहे. योगीजींना बाजूला केले. राजनाथ सिंह यांनाही बाजूला केले. मोदीजी तरुण होते तेव्हा मगरीशी भिडले होते हे आठवतंय का? पण मला वाटलं त्यांना पोहताच येत नसेल, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक टोला लगावला.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम, महाविकास आघा़डीला २६ मार्च पर्यंतची मुदत

आगामी लोकसभा निवडणूकीत काहीही करून भाजपाला केंद्रातील सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *