राज्यातील पोलिस बदल्यांमध्ये झालेल्या घोटाळा झाल्याचा आरोप करत फोन टॅपिंग संदर्भातील अहवाल प्रसारमाध्यमांमध्ये दाखविल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आपण जबाब नोंदविण्यासाठी सकाळी ११ वजाता जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर काही तासात चक्रे फिरली आणि गुन्हे शाखेच्या सहपोलिस आयुक्तांनी फडणवीसांना फोन करत तुम्ही येण्याची गरज नाही आम्हीच येतो जबाब घेण्यासाठी असे सांगितल्याची माहिती दस्तुरखुद्द फडणवीस यांनीच ट्विट करत दिली. त्यानंतर काँग्रेसने यासंदर्भात फडणवीस यांना सवाल करत क्रिमिनल प्रोसिजर कोडनुसार १६० म्हणजे तपासात सहकार्य करणे असेल तर प्रश्नावली पाठविल्यावर उत्तर का दिली नाही? असा सवाल केला.
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यासंदर्भात ट्विट करत फडणवीस यांना म्हणाले की, CRPC १६० म्हणजे तपास कार्यात मदत करणे असे फडणवीसांचे म्हणणे असेल तर मग पोलिसांनी त्यांना प्रश्नावली पाठविली असताना त्याची उत्तरे का दिली नाहीत? पोलिस स्टेशनसमोर शक्तीप्रदर्शन करणे तपास कार्यात अडथळा नव्हे काय? देवेंद्रजी आपण कायद्यापेक्षा मोठे आहात काय? असा खोचक सवाल काँग्रेसने उपस्थित केला.
वास्तविक पाहता पोलिसांनी जवळपास ५ वेळा देवेंद्र फडणवीसांना प्रश्नावली पाठवित त्याची उत्तरे मागितली होती. परंतु फडणवीसांनी पोलिसांला त्यांनी पाठविलेल्या एकाही पत्राचे उत्तर दिले नाही. मात्र सहाव्यांदा जेव्हा पोलिसांनी पत्र पाठवित जबाब नोंदविण्यासाठी बीकेसीतील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले तेव्हा फडणवीस यांनी आपल्या टिपिकल शैलित याचे राजकिय भांडवल करत महाविकास आघाडीवरच डाव उलटविला. त्यातच पोलिसांनी तुम्ही नका येवू आम्हीच येतो असे फोन करून कळविल्याने आता फडणवीसांना अपेक्षित असलेला राजकिय परिणाम साधला गेल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.
CRPC 160 म्हणजे तपास कार्यात मदत करणे असे फडणवीसजींचे म्हणणे असेल तर मग पोलिसांनी त्यांना प्रश्नावली पाठविली असताना त्याची उत्तर का दिली नाहीत ?
पोलिस स्टेशन समोर शक्तिप्रदर्शन करणे तपासकार्यात अडथळा नव्हे काय?
देवेंद्रजी आपण कायद्यापेक्षा मोठे आहात काय? pic.twitter.com/2z9slwikHD— Atul Londhe Patil (@atullondhe) March 12, 2022