काही महिन्यांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस आली होती. मात्र आता पर्यंत त्या नोटीसीबाबत राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेकवेळा बोलण्याचे टाळले होते. मात्र आज पहिल्यांदाच मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पहिल्यांच बोलताना म्हणाले की, मलाही ईडीची नोटीस आली. त्यानंतर मी त्याच्या त्यांच्यासमोर गेलो. बरं ती नोटीस कशाबद्दल होती. तर माझा जो व्यावसायिक पार्टनर होता त्याला आम्ही टॅक्सचे पैसे दिले होते. मात्र ईडी म्हणत होती की, तो कर भरला नसल्याने ही नोटीस पाठवली. त्यानंतर आमचा जो सीए होता त्याला बोलावले. त्याने सांगितले की, कर भरण्यासाठी पैसे दिले होते. मात्र त्या भागिदाराने ते पैसे भरलेच नाहीत असे आमच्या सीएने सांगितले. मग मी विचारलं आता काय करायचं सीएने सांगितले की, आता तो कर पुन्हा भरायचा. अन् आम्ही तो कर पुन्हा भरला आणि हा विषयच संपला अशी कबुली यावेळी दिली.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ईडीच्या नोटीशीमुळे राज ठाकरे घाबरले आणि त्यांनी पंतप्रधान मोदी-भाजपाचे गुणगान गायला सुरुवात करणाऱ्यातला हा राज ठाकरे नाही असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त करीत थेट भाजपावरच निशाणा साधला. विधानसभेतील विजयावरही त्यांनी संशय व्यक्त केला. मनसेवर लोकसभा निवडणुकीपासून भूमिका बदलाचा आरोप होत आहे, त्यावर राज ठाकरे यांनी प्रकाश टाकत विरोधकांवर शरसंधान साधले. भारतीय जनता पक्ष, शरद पवार आणि शिवसेना यांनीही परिस्थितीनुसार निर्णय घेतले आहेत. मात्र त्यांनी निर्णय घेतले की ते परिस्थितीनुरुप निर्णय ठरतात आणि राज ठाकरेने निर्णय घेतला की त्याला भूमिका बदलाचा ठपका ठेवला जातो. या सगळयांनी स्वार्थासाठी भूमिका बदलली, मी कोणत्याही स्वार्थासाठी भूमिका बदलली नाही असे परखड मतही यावेळी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मुंबईतील वरळीत मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधीत करताना राज ठाकरे यांनी जुने दाखले देत इतर पक्षांच्या बदलत्या भूमिकेवरून विरोधकांवर शरसंधान साधले.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला. त्यांना आत टाकू म्हटले होते. पण मंत्रिमंडळात टाकलं. अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप आहे. त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. राधाकृष्ण विखे पाटील आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर भाजपामध्ये गेले आता राज्यात मंत्री आहेत. हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून भाजपामध्ये गेल्यावर आता शांत झोप लागते म्हणाले होते, ते आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. नारायण राणे, बबनराव पाचपुते, पद्मसिंह पाटील, विजय सिंह मोहिते पाटील यांच्यावर आरोप झाले, हे सर्व आज भाजपासोबत गेले. या सगळयांना कोणी विचारत नाही, तुम्ही भूमिका बदलली. देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते अनेक लोक आता त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. यांना कोणी विचारत नाही, भूमिका का बदलली ? असा सवालही यावेळी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी भाजपाने कोणा-कोणासोबत युती केली याचा पाढा वाचला. कलम ३७० ला विरोध करणाऱ्या फारुख अब्दुल्लांसोबत त्यांनी एनडीएचे सरकार स्थापन केले. दहशतवाद्यांना सोडून देणाऱ्या सईद यांच्या मुलीसोबत काश्मीरमध्ये भाजपाने सरकार स्थापन केले. महाराष्ट्रात शरद पवारांसोबत जनसंघ होता, याचीही आठवण राज ठाकरेंनी करुन दिली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्या झालेला पराभवावर त्यांनी भाष्य केले. शरद पवारांचे ८ खासदार निवडून आले होते, त्यांचे १० आमदार येतात. लोकसभेला ज्या अजित पवार यांचा एक खासदार निवडून येतात त्यांचे ४२ आमदार चार महिन्यात निवडून आले. काय झालं, कसं झालं, हा संशोधनाचा विषय आहे असेही यावेळी सांगितले.
पक्षात नवी आचारसंहिता
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, येत्या काळात पक्षात कार्यकर्त्यांपासून ते नेत्यापर्यंत आचारसंहिता आणली जाणार आहे, प्रत्येकाला जबाबदारी आणि आचारसंहिता आखून दिली जाईल असे राज ठाकरे यांनी सांगत पक्ष संघटनेत बदलाचे संकेत दिले. अनेक विजय पराभव मी पाहिले आहेत, खचलेल्यांच नेतृत्व मला करायचं नाही माझ्या सोबत राहायचं असेल तर ठाम राहा राज्यातील मराठी माणसासाठी हिंदूंसाठी जे कराचं आहे ते मी करणार ते आपल स्वप्न आहे असे सांगत पक्ष व संघटनेत बदलाचे संकेत दिले.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मनसेने भाजपाला साथ दिली होती. तसेच विधानसभा निवडणुक निकालानंतरही भाजपा नेत्यांच्या राज ठाकरेंशी होत असलेल्या भेटीगाठीमुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे भाजपा युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण त्यावरही राज ठाकरे यांनी भाष्य करताना सांगितले की, मला भाजपाचे लोक भेटायला येतात. मी त्यांना काय नाही म्हणू ? तुमच्या घरी चहा प्यायला येतो असं कोणी म्हणलं तर तुम्ही नाही म्हणाल का ? माझयाकडे चहा प्यायला कोणीही आले तरी मी तुम्हाला कधी विकलं नाही, तुमच्यावरचं प्रेम कमी झालं नाही माझा मराठीचा बाणा, मी कधी बोथट करत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असे संकेतही यावेळी दिली. त्यामुळे मनसे भाजपा युतीची आशा मावळली आहे.
आज ३० जानेवारी २०२५ रोजी मुंबईतील राज्य पदाधिकारी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांशी आणि महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला. त्या संवादातील महत्वाचे मुद्दे – https://t.co/qEyXlSNlVn
१) विधानसभा निकालानंतर मी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर मी बोललो नाही याचा अर्थ मी शांत होतो असं नाही. विचार…
— Raj Thackeray (@RajThackeray) January 30, 2025