Breaking News

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एन्ट्री पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समितीवरून भारत राष्ट्र समिती नव्या पक्षाचे नाव

देशात वाढत्या भाजपाच्या हिंदूत्ववादी राजकारणाला रोखण्यासाठी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात येत तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेत भाजपेतर पक्षाची मोट बांधण्यासाठी आपण तयार असल्याचे जाहिर केले. तसेच महाराष्ट्राने नेहमीच दिल्लीच्या तख्ताला टक्कर दिल्याने या गोष्टीची सुरुवात महाराष्ट्रातून करणार असल्याचे जाहिर केले. त्यानुसार नव्या राष्ट्रीय पक्षाची स्थापनेच्या नावाचे फलक नांदेड शहरात लावले. त्यानंतर दुपारी हिंगोली चौकात झालेल्या जाहिर सभेत बोलताना मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव म्हणाले, अब की बार किसान सरकार अशी घोषणा देत दरवर्षी २५ लाख मागासवर्गीयांना १० लाख देणार असल्याची मोठी घोषणा केली. तसेच शेतकरी आत्महत्या आणि पाण्याच्या नियोजनावरून राज्यासह केंद्र सरकार टीका केली.

आज अहेरी येथील माजी आमदार दीपक आत्राम यांनी केसीआर यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश केला आहे.
के चंद्रशेखर राव म्हणाले, देशात आज परिवर्तनाची आवश्यता आहे. देशाला आज स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष झाली आहेत. यादरम्यान देशात अनेकदा सरकारे बदलली. अनेक नेते, आमदार खासदार बदलले. अनेकांनी मोठी आश्वासने दिली. मात्र, आज देशात पिण्यासाठी पाणी नाही, शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी नाही, गरिबांना आज वीजदेखील मिळत नाही. त्यामुळे या गोष्टी आपण समजून घेऊन एकत्र लढा दिला पाहिजे, असे आवाहनही केले.

आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. याचं कारण काय? जेव्हा सर्व रस्ते बंद असतात, तेव्हाच माणूस आत्महत्या करतो. देशाला अन्न देणारा अन्नदाता आज आत्महत्या करण्यासाठी मजबूर झाला आहे. यापेक्षा वाईट कोणतीही गोष्ट नाही. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे, तर राजकीय नेते विधानसभेत आणि संसदेत भाषण देण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे ‘अबकी बार किसान सरकार’, अशा नारा बीआरएस पार्टीने दिला आहे, असेही म्हणाले.

देशात आज ४२ टक्के शेतकरी आहेत. त्यात आणखी शेतमजुरांची संख्या जोडली, तर ही आकडेवारी ५० टक्क्यांच्यावर जाते आणि सरकार बनवण्यासाठी एवढी संख्या पुरेशी आहे. फक्त आपल्याला जाती धर्माच्या आधारे न लढता, एकत्र येऊन काम करावे लागेल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तसेच भारत हा बुद्धीजिविंचा देश आहे, बुद्धू लोकांचा देश नाही, असेही ते म्हणाले.

Check Also

एसटी बस चालक-वाहकांसाठी खुषखबरः रात्रीच्या वस्ती भत्त्यात वाढ होणार बस स्थानकांवरील विश्रांतीगृहांसह स्वच्छतागृहांची- सुधारणासह स्वच्छता करणार-मंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही

महाराष्ट्र राज्य परिवहन (एस. टी) महामंडळाच्या राज्यातील विविध बसस्थानकांवर बस चालक आणि वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहांमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *