Breaking News

२२ दिवसानंतर मुख्यमंत्री रूग्णालयातून घरी परतले आणखी दोन-तीन महिने घरी आराम करण्याच्या डॉक्टरांच्या सूचना

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मानदुखीच्या आजारावरील उपचारासाठी मुंबईतील रिलायन्स रूग्णालयात १० नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यानर १२ नोव्हेंबर रोजी स्पाईन सर्जरी करण्यात आली. त्यानंतर जवळपास १४ दिवसानंतर त्यांच्यावर फिजोओथेरपीचे उपचार सुरु करण्यात आल्याने आणखी काही दिवस रूग्णालयातील मुक्काम वाढला. मात्र आज अखेर त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शरीराच्या इतर व्याधी असल्याने स्पाईनची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना पूर्ण बेडरेस्ट घेण्याचे डॉक्टरांनी सांगिचतले होते. त्यामुळे त्यांना घरी गेल्यानंतर बेडरेस्ट मिळण्याची शक्यता कमी असल्याने त्यांना रूग्णालयातच ठेवण्यात आले. तसेच त्यांच्यावर १५ दिवसानंतर फिजोओथेरपीचे उपचार सुरु कऱण्यात आले. या फिजोओथेरपीचे उपचार करण्यास किमान सात ते दहा दिवस लागतात. त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत चांगल्यापैकी सुधारणा झाल्याचे दिसून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना आज रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.
पुढील काही दिवस अर्थात साधारणतः महिना दोन महिने त्यांना पूर्णतःची गरज आहे. त्यामुळे त्यांना पुढील काही दिवस घरी राहून आराम करण्याची सूचना डॉक्टरांनी केली. त्यामुळे जरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना घरी सुट्टी देण्यात आलेली असली तरी त्यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा कारभार पूर्णपणे स्विकारण्यास वेळ लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रूग्णालयात असतानाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडून राज्यात घडणाऱ्या घडामोडी, आणि महत्वाच्या प्रश्नांवर काय भूमिका घ्यायची याबाबतचे फोनवरून मार्गदर्शन करण्याचे आणि माहिती घेण्याचे काम त्यांच्याकडून सुरु होते. फक्त त्यांना रूग्णालयात जावून प्रत्यक्ष भेटण्याची परवानगी कोणालाही नव्हती. त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, त्यांचे सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे सतत असायचे तर मुले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांची ये-जा असायची. साधारणतः किमान आणखी एक महिनाभरानंतर ते पूर्णपणे आपल्या पदावर सक्रिय होतील असे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *