Breaking News

भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून मुख्यमंत्री म्हणाले, “विक्रांत”च्या पैशातून तुम्ही घरचं राशन भरलं… कोल्हापूरतील प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी काढले उट्टे

भाजपाले आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, पण ज्या युध्द नौकेने पाकिस्तानला पाणी पाजलं ती युध्द नौका तुम्ही विकायला काढली. बर त्याच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केलात. पण त्या पैशाचे काय केलात तर तुम्ही तुमच्या घरचं राशन भरलात. भाजपा इतकी कोडगी आहे की ज्याने त्या विक्रांतच्या नावावर पैसे जमा करून गायब केले त्याची बाजू घेतायत अशी टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी किरीट सोमय्या आणि भाजपावर केली.

उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणूकीतील काँग्रेच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ सभेत ते ऑनलाईन पध्दतीने भाषण करता त्यांनी वरील टीका केली.

देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यावर बोलायला गेलं की ते म्हणतात तुम्ही तुमच्या राज्यातील कर कमी करा. भाजपा शासित राज्यात कर कमी केल्याने तेथील लोकांना स्वस्त दरात पेट्रोल-डिझेल मिळत असल्याचे त्यांचे उत्तर असते. म्हणजे आम्ही कमी करत रहायचे आणि तुम्ही ते वाढवत रहायचे, हे कुणी सांगितले. म्हणजे तुम्ही तुमचा कर कमी करायचा नाही उलट राज्याचा कर कमी करून नुकसान करायचे म्हणजे जे तुमचं आहे ते तुमचंच आणि जे दुसऱ्याचं आहे ते ही तुमचेच अशी खरमरीत टीकाही त्यांनी राज्याच्या कर हिश्यावरून केली.

बरे हे सांगतात आम्ही जनतेला राशन दिले म्हणून पण ते कसं खायचे ते नाही सांगितले. एकाबाजूला गॅसच्या किंमती इतक्या वाढवून ठेवल्यात की ते घेणेच परवडत नाही. त्यामुळे ते शिजवून खायचं की कच्च खायचं हे काही लोकांना सांगितले नाही असा उपरोधिक टोला लगावत लोकांना सुरुवातीला वाजत गाजत दिलेल्या गॅसच्या टाक्या आता एका कोपऱ्यात फेकून दिल्या आहेत. मग काय आता त्याच टाक्याचे डोल वाजवून यांना सांगायचे का की गॅस परवडत नाही म्हणून असा टोलाही त्यांनी महागाईवरून केंद्र सरकारला लगावला.

बेळगांव मध्ये तेथील महापालिकेवर सत्ता मराठी माणसांची होती. तर ती सत्ता हिसकावून घेण्यासाठी तेथील मतदारसंघाची मोडतोड केली, ते वार्ड कन्नड भाषिकांच्या मतदारांशी जोडले. जेणेकरून मराठी माणसाची सत्ता राहणार नाही म्हणू. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला भगवा काढून तेथे स्वत:चा नकली बनावट भगवा फडकाविला अशी टीका करत भाजपा हिंदूत्वाच्या नावाखाली दुसरं बनावट हिंदूत्व निर्माण करत असून त्या खोट्या हिंदूत्वाला आणि भगव्याला बळी पडू नका असे आवाहन करत काँग्रेसच्या उमेदवारालाच मत द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *