Breaking News

१० जानेवारीपासून राज्यात लागू होणार हे नवे कडक निर्बंध : आदेश जारी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मराठी ई-बातम्या टीम

नवं वर्षात राज्यातील ओमायक्रॉन आणि कोविडचे संकट पुन्हा निर्माण झाल्याने आणि रूग्ण संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले असून हे निर्बंध पुढील प्रमाणे…

रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु अत्यावश्यक कारण वगळता कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडता येणार नाही.

पहाटे ५ ते रात्रो ११ वाजेपर्यंत ५ पेक्षा अधिक लोकांना फिरण्यास बंदी.

सरकारी कार्यालयात लेखी परवानगी असल्याशिवाय जाता येणार नाही. तसेच कार्यालयात बैठका घेताना ऑनलाईन बैठकांवर भर देण्यात यावा. रॅशनल पध्दतीने सरकारी कर्मचाऱ्यांनी हजेरी लावावी.

प्रत्येक कार्यालयाच्या मुख्याद्वारावर सॅनेटायझर आणि थर्मल स्क्रिनिंग सुरु करावे.

खाजगी कार्यालये- मध्ये रॅशनल पध्दतीने कर्मचाऱ्यांना कामावर बोलवावे, तसेच ५० टक्केपेक्षा जास्त उपस्थिती राहू देवू नये. त्याचबरोबर २४ तास कामांचे नियमन करावे.

या सर्व गोष्टी करताना महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे नियमनही करावे.

लसींचे दोन मात्रा घेतलेल्या व्यक्तींनाच कामावर बोलवावे. तसेच ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांना लसीकरणासाठी उद्युक्त करावे.

लग्नासाठी ५० जणांची उपस्थिती बंधनकारक.

अंत्यसंस्कारासाठी फक्त २० जणांची उपस्थिती बंधनकारक.

सांस्कृतिक, राजकिय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमासाठी फक्त ५० जणांची उपस्थिती बंधनकारक.

१५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सर्व शाळा-कॉलेज, कोचिंग क्लासेस बंद.

१०-१२ वीच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने ज्या गोष्टी घेणे बंधनकारक असतील त्या घेण्यास शिक्षण बोर्डास मुभा देण्यात आली आहे.

 स्विमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर आदी सर्व गोष्टी बंद. मात्र दाढी-कटींगची दुकाने ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी. रात्री १० ते सकाळी ७ या कालावधीत बंद राहणार.

ज्या खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धा किंवा आंतरराष्ट्रीयस्तरावरील ज्या निर्धारीत आणि नियोजित असतील त्या स्पर्धा सुरु राहतील. मात्र त्या प्रेक्षकाशिवाय घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

करमणूक पार्क, प्राणी संग्रहालये, किल्ले आणि इतर तिकीट लावून असलेली ठिकाणे, पर्यटनस्थळे आदी गोष्टी बंद राहणार.

शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्पलेक्सस ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. तसेच आतमध्ये असलेल्या नागरीकांची संख्या दर्शनी भागावर दाखविणे बंधनकारक आहे. फक्त लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात यावी. रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहतील.

रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी मात्र आतील गिऱ्हाईकांची नोंद दर्शनी भागावर लावणे बंधनकारक.

नाट्यगृहे, सिनेमा हॉल ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी.

आतरराष्ट्रीय प्रवासासाठी केंद्र सरकारच्या नियमानुसार परवानगी. तर देशांतर्गत प्रवासासाठी ७२ तास आधीची आरटीपीआर चाचणी अहवाल असणे आवश्यक आहे. हा नियम ड्रायव्हर, क्लिनर यांचेही चाचणी अहवाल असणे आवश्यक.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यास फक्त पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीस परवानगी.

युपीएससी, एमपीएससी आणि अन्य प्राधिकरणाच्या परिक्षा घेण्यास परवानगी. मात्र त्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीने मंजूरी घेणे आवश्यक आहे.

रेल्वे स्टेशन, एसटी स्थानक, विमानतळावर फक्त आरक्षित तिकिट असेल तरच तेथे जाण्यास परवानगी.

अत्यावश्यक सेवेत येणारे व्यक्ती- हॉस्पीटल, डायगोन्स्टीक सेंटरचे कर्मचारी, क्लिनिक, लसीकरणाचे कर्मचारी, मेडिकल, विमा कर्मचारी, फार्मसी, पॅरा मेडिकल कंपनीचे कर्मचारी आणि इतर आरोग्य विषयक कर्मचारी, ट्रान्सपोर्ट सप्लाय चैनचे कर्मचारी.

Check Also

पडळकरांचा मंत्री वडेट्टीवारांना टोला, “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” ओबीसी विभागासाठी फक्त साडेचार कोटी दिले

मराठी ई-बातम्या टीम   ओबीसी मंत्री विजय वडेडट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *