Breaking News

मुख्यमंत्र्यांचे आवाहन, वाढदिवस सेलिब्रेशन नको पण मुख्यमंत्री सहायत्ता निधीत योगदान द्या राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी

कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

२७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मिडीया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्विकारू असे त्यांनी सांगितले.

राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे असल्याने वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत अशी विनंतीही त्यांनी केली.

पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पडावे असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री सहायता निधी

बचत खाते क्र.-३९२३९५५९१७२०

स्टेट बँक ऑफ इंडिया, मेन ब्रँच,

फोर्ट, मुंबई-४०००२३.

ब्रँच कोड-००३००

आयएफएससी कोड-SBIN0000300

या देणग्यांना आयकर अधिनियम १९६१ च्या ८० (जी) नुसार आयकर कपातीतून १००% सुट आहे.

Check Also

दादरमध्ये एकनाथ शिंदे गटाकडून प्रती सेनाभवन शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर यांची माहिती

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये आता शिवसेनेत बंडाचे निशाण फडकाविलेल्या एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना भवनच्या धर्तीवर …

Leave a Reply

Your email address will not be published.