Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेकडून संभाजी राजेंचे कौतुक तर फडणवीसांना तिरकस बाण अनेकजण आदळआपट करत आहेत मात्र मी त्यावर बोलणार नाही

मुंबई: प्रतिनिधी

संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे करोनाची साथ पसरण्याचा धोका आहे असा टोला भाजपाला लगावत अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत ओबीसी आरक्षणप्रश्नी भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पहात नसल्याचे एकप्रकारे दाखवून देत भाजपाला तिरकस बाणांनी घायाळ केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर संभाजी राजेंनी घेतलेल्या भूमिकेचे आवर्जून स्वागत करत त्यांचे कौतुक करत भाजपा आणि फडणवीसांना कानपिचक्याही दिल्या. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजपा आज रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलनाची हाक देत सकाळी आंदोलनास सुरुवात केली. राज्यभरात आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सारथीच्या कोल्हापूरातील उपकेंद्राचं उद्घाटन केले. या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

सारथी उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांचं कौतुक करत मराठा समाजाचे आभार मानले. न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरणं हा भाग आहे. पण संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळतं तोच नेता होऊ शकतो. संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात. अनेकजण आदळआपट करत असल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज वाटलं असतं, तर काहीही करु शकला असता. आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायचे आहेत. आपण कायद्याची लढाई सोडून दिलेली नाही. आपला समजुतदारपणा समाजाला दिशा दाखवणार आहे. मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल ते सर्व सरकारकडून केले जाईल. सरकार कोणत्याही प्रकारे मागे राहणार नाही, असे वचन मी तुम्हाला देतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

राज ठाकरे-अमित शाह भेट होणार का? फडणवीस यांनी दिले ‘हे’ संकेत आयत्या वेळी होवू शकते भेट

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published.