Breaking News

संभाजी राजेंनी केले भुजबळांचे कौतुक, हेच शाहू महाराजांच्या विचाराचे खरे वारसदार मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनंतर खासदार संभाजी राजेंचे वक्तव्य

छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून ओबीसींचे नेतृत्व करत आहेत. त्याबद्दल मला आनंद आहे. भुजबळ हे शाहू, फुले आणि आंबेडकरांचा विचार घेऊन समतेचा लढा लढत आहे. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांची लढाई सुरू आहे. मी नुसता वंशज छत्रपती घराण्याचा वशंज आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारावर माझी वाटचालही सुरू आहे. पण छगन भुजबळ हेच शाहू महाराज यांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत, असे गौरवोद्गार खासदार छत्रपती संभाजी छत्रपती यांनी काढले. ओबीसी, एसटी, एससी आणि मराठा समाजाला एकत्र नांदू शकतो यासाठी आमचा प्रमाणिक प्रयत्न सुरू आहे, असेही संभाजी छत्रपती यांनी सागितले.
खासदार संभाजी छत्रपती हे आज नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.
शाहू महाराजांचे आणि नाशिककरांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शाहू महाराज नाशिकला आले होते. तेव्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाला त्यांनी मदत केली होती. पिंपळगाव बसवंत येथे गणपतराव मोरेंना त्यांनी ताकद दिली होती. ६ मे रोजी शाहू महाराजांची स्मृती शताब्दी आहे. त्यानिमित्ताने शाहू महाराजांचे विचार जगभर पोहोचवण्यावर आमची चर्चा झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अठरापगड जातीचे राज्य होते. शाहू महाराजांनीही हीच भूमिका पुढे नेली. तोच विचार आम्हाला पुढे न्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
मागे एकदा संभाजी महाराज नाशिकला येणार अस ठरले होते. त्यानुसार त्यांनी आज नाशिकला भेट दिली. त्यांच्यासोबत आज बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. शाहू महाराजांच्या जयंतीबाबत चर्चा झाली. शाहू महाराज आमचे दैवत आहे. शरद पवार साहेबांशी चर्चा करून शाहूंच्या स्मृती शताब्दीचा कार्यक्रम मोठा करण्याचा प्रयत्न करू. प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. सत्यशोधक समाजाच्या लोकांना शाहू महाराजांनी मदत केली होती. देशभरात जे वातावरण आहे त्याबद्दल वेगळे सांगायला नको. फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार या दलदलीतून देशाला वाचवू शकतात असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

Check Also

आमदार बच्चू कडू यांनी उध्दव ठाकरे यांचे कौतुक करत केली टीका मंत्री पदाच्या मागणीवर ठाम असल्याचा पुर्नरूच्चार

केंद्रीय गृहमंत्री खरं बोलतात की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरे बोलतात हा संशोधनाचा विषय आहे …

Leave a Reply

Your email address will not be published.