Breaking News

चंद्रकांत पाटील म्हणाले विश्वासघातकींची सोबत नाही: राऊत तुमच्या दंडात ती ताकद नाही हम किसेको टोकेंगे नही अगर टोका तो छोडेगें नही शिवसेनेला पाटलांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी

मोदींच्या नावावर मते मागूनही भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करणाऱ्यांना सोबत न घेता भाजपा एकट्याने मित्रपक्षासोबत निवडणूका लढवेल आणि जिंकेल असा विश्वास व्यक्त करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला विश्वासघातकी म्हणून टीका करत संजय राऊत हे जी भाषा वापरत आहेत त्या पध्दतीचे शस्त्र उचलण्याइतपत ताकद तुमच्या दंडात नसल्याचे आव्हानही त्यांनी दिले.

औरंगाबाद नंतर जालना येथील दौरा संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कऱ्हाड यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते.

मी तर फक्त पाठीत खंजीर खुपसला असे वक्तव्य केले होते. मात्र शिवसेनेचे संजय राऊत म्हणतात आम्ही पाठीत खंजीर खुपसूत नाही तर समोरून कोथळा काढतो. ज्या केंद्रीय मंत्री मी तिथे असतो तर चापट मारली असती म्हणणाऱ्या नारायण राणे यांच्यावर तुम्ही कारवाई केली. आता तर राऊत हे कोथळा काढायची हिंसेची खुनाची भाषा बोलत आहेत. मग त्यांच्यावर अशीच कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित करत आम्ही सभ्य माणसे आहोत. मात्र इतकेही सभ्य नाहीत की एका गालावर चापट मारली तर दुसरा गाल पुढे करू. आमचे धोरण आहे की, हम किसी को टोकेंगे नही लेकीन हम को टोका तो छोडेंगे नही असा इशाराही त्यांनी शिवसेनेला त्यांनी दिला.

२०१४ मध्ये भाजपा-शिवसेना युती तुटल्यानंतरही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न झाले. त्यानंतर २०१९ मध्येही या दोन पक्षांशी युती करून सरकार आणण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी झाले. ५६ आकड्यावर त्यांना मुख्यमंत्री पद मिळाल्यामुळे आमचा विश्वासघात करून त्यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करत आम्हाला अशांबरोबर काम करायचे नसल्याचे सांगत भाजपा शिवसेनेबरोबर युती करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे भाजपा आगामी महानगरपालिका, नगरपालिका पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा, लोकसभा या सगळ्या निवडणुका आपल्यासोबत जे पक्ष प्रमाणिकपणे आहेत. जे आमच्यावर खूप प्रेम करतात, जे आमच्याशी दगाबाजी नाही करत, असे मग सदाभाऊ खोत, रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, विनय कोरे या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही एकट्याच्या जीवावर निवडणुका लढवणार आणि जिंकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितला अभंगाचा नवा अर्थ, जो भंग होत नाही… देहू येथील संत तुकारामांच्या शिळा मंदिराचे लोकर्पण

संत तुकाराम महाराज हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published.