Breaking News

आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मानले अनिल देशमुखांचे आभार काटोल नगर परिषदेच्या विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजना उद्घाटनावेळी केले वक्तव्य

मराठी ई-बातम्या टीम

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे ईडीने सुरु केलेल्या कारवाईत सध्या आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचे आभार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मानले असून त्यामागे कारणही खास आहे.

काटोल नगर परिषदेच्या वतीने आयोजित विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमासाठी केंद्रीय नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी भूमीपूजन आणि उद्घाटन केल्यानंतर बोलताना म्हणाले की, नागपूर ते काटोल चौपदरी रस्त्याच्या कामासाठी परवानगी मिळण्यासाठी अनिल देशमुख यांनी मदत केली. त्यामुळे आपण त्यांचे खास आभार मानतो. असे गडकरी म्हणाले.

नागपूर ते काटोल या चौपदरी रस्त्याचा आज शुभारंभ झाला आहे. या रस्त्यासाठी अनेक अडचणी आल्या. वनविभागाने हा वाघांच्या जाण्याचा मार्ग असल्याचे सांगितले. माझा जन्म तुमच्या आधी झाल्याचे मी त्यांना म्हटले. इतक्या वर्षात इथे कोणत्या गावात वाघ शिरला नाही तर तुम्ही कुठे घुसवत आहात. त्रास द्यायचे काम कशाला करता. अनिल देशमुखांनी मदत केली तेव्हा वनविभागाची परवानगी मिळाली. नाहीतर मिळतचं नव्हती असा किस्साही त्यांनी यावेळी सांगितले.

या रस्त्याकरता त्यांचेही मी आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये सगळ्या अडचणी दूर करुन हा रस्ता पूर्ण होणार आहे. नागपूरमध्येही रस्ता चौपदरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

परमबीर सिंग यांनी एपीआय सचिन वाझे यास १०० कोटी रूपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव या प्रश्नी कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितले. त्यानुसार परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल न करता प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले. नेमक्या त्याचवेळी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीनेही तपास सुरु केला. या तपासातून काय निष्पन्न झाले या बाबतची माहिती अद्याप बाहेर आली नसली तरी ईडीने न्यायालयाने सुणावलेल्या न्यायालयीन कोठडीत सध्या अनिल देशमुख आहेत. तसेच त्यांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात आहे.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *