Breaking News

पत्रिकेत नाव छापलं नाही म्हणून पंकजा मुंडे झाल्या धनंजय मुंडेंवर नाराज त्यांनी मोठेपणा दाखवला नाही मात्र नक्की दाखवू

राज्यात मुंडे बहिण-भावातील राजकिय कुरघोडीमुळे बीड जिल्हा कायम चर्चेत असतो. कधी निवडणूकीच्या निमित्ताने तर कधी साध्या साध्या गोष्टींवरील वक्तव्यावरून. मागील काही दिवसांपासून बीडच्या बदनामीच्या मुद्यावरून मुंडे बहिण-भावात चांगलेच शाब्दीक युध्द रंगले असतानाच जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेवर नाव छापलं नाही म्हणून नाराज झालेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, आम्ही सत्तेत असताना प्रत्येक कोनशीला आणि निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे नाव असायचं पण त्यांनी आज मोठेपणा दाखवला नाही. पण आम्हील नक्कीच दाखवू असे सांगत आपली नाराजी उघडपणे बोलून दाखविली.
तसेच मी बीड जिल्ह्याची बदनामी नाही, तर काळजी घेतली असे सांगत अप्रत्यक्ष मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकाही केली.
धनंजय मुंडे यांनी शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले, तर सायंकाळी बीड तालुक्यातील बेलेश्वरमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
बीडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावरूनही मुंडे बहीण भावात चांगलीच जुंपली आहे. धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका? अशी टीका भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केली होती. यावर प्रीतम मुंडे यांनी प्रत्युत्तर देत खासदार प्रीतम मुंडे यांनी तुमच्याच नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली असल्याचा टोला लगावला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी जाहीर आव्हानच दिले होते.
बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतानाच बीड बिहार झालाय, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली होती. यावरच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना हात जोडून विनंती करतो पण जिल्ह्याची बदनामी करू नका, अशी विनंती केली होती. त्यावर प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्याची जी बदनामी झाली आहे, ती तुमच्या नाकर्तेपणामुळे झाल्याचा टोला लगावला होता.
ज्या खासदार सात-साडे सात वर्ष काम करत आहेत. देशाच्या नेत्या म्हणून त्यांच्या वडीलभगिनी काम करत आहेत. त्यांच्या कार्यकाळात रेल्वेचा डबा तयार करण्याचा कारखाना लातूरला जातो. मग कोणाचा नाकर्तेपणा? असा खोचक पलटवार धनंजय मुंडेंनी खासदार प्रितम मुंडे यांच्यावर केला.
तो कारखाना इथे असता तर आम्हीदेखील स्वागत केले असते. तुम्ही किती कर्ते आहात हे आम्हीच जगाला सांगितलं असते. पण खासदार, मंत्री, केंद्रात सरकार असूनही इतका मोठा प्रकल्प या मागासलेल्या बीड जिल्ह्यात तुम्हाला थांबवता आला नाही आणि आम्हाला नाकर्ते म्हणता असे टीका करत कर्ते, नाकर्तेपणाची चर्चा एकदा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या असं आव्हानही धनंजय मुंडे यांनी भगिनी प्रितम मुंडे यांना दिले.
पण कृपा करुन जिल्ह्याला बदनाम करु नका. जिल्ह्याच्या मातीची किंमत तुम्हाला कळलेली नसली तरी आमचे त्याच्याशी इमान जोडलेले आहे, त्याची चेष्टा करु नका अशी विनंतीवजा सूचनाही ते करायला विसरले नाहीत.

Check Also

अमोल मिटकरी आणि शहाजीबापू पाटील यांच्यात कलगीतूरा, बारकी पोरंही… टोला प्रति टोल्याने दोघांतील वादांत वाढतेय रंगत

गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published.