Breaking News

बिहारमध्ये पंतप्रधान मोदींना हादरा, भाजपाबरोबरील नितीश कुमार यांचा संसार मोडीत काँग्रेस, आरजेडी आणि डाव्यांबरोबर पुन्हा सत्ता स्थापन करणार

महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी शिवसेनेत बंड घडवून आणत भाजपाने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांना सोबत घेत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची स्थापना केली. तर दुसऱ्याबाजूला बिहारचे नितीश कुमार यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे मुख्यमंत्री पदावर बसवित भाजपाने सरकार चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील संयुक्त जनता दल आणि भाजपामधील कुरबुरींत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने अखेर नितीशकुमार यांनी अखेर भाजपाच्या पाठिंब्यावर असलेल्या सरकारचा राजीनामा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट हादरा दिला.

त्याचबरोबर नितीशकुमार यांनी त्या सरकारचा राजीनामा देत आरजेडी-काँग्रेस-डाव्या पक्षाच्या मदतीने नवा सत्ता स्थापनेचा दावा केला असल्याचे समजते. बिहारमध्ये जवळपास भाजपाच्या मदतीने दोन वेळा सत्तास्थानी राहिलेल्या नितीशकुमार आणि भाजपामध्ये कुरबुरी वाढत होत्या. २०१८-१९ मध्ये बिहार झालेल्या विधानसभा निवडणूकीत नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला कमी जागा मिळाल्या होत्या. मात्र भाजपाने जागा कमी आल्या तरी नितीशकुमारच मुख्यमंत्री राहतील अशी घोषणा केली होती. त्यानुसार नितीशकुमार यांनाच बिहारचे मुख्यमंत्री करण्यात आले. मात्र या सरकारमधील प्रमुख खाती भाजपाला देण्यात आली होती. त्यामुळे या सरकारवर भाजपाचाच प्रभाव होता.

नितीशकुमार यांच्या या निर्णयामुळे येथे नवे सत्तासमीकरण जुळून येण्याची शक्यता आहे. तसे संकेत खुद्द नितीशकुमार यांनी दिले आहेत. नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) तसेच अन्य मित्रपक्षांसोबत महागठबंधन करून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

मी राज्यपालांची भेट घेऊन माझ्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. महागठबंधनमध्ये एकूण सात पक्ष आहेत. महागठबंधनमधील सर्व पक्षांचे एकूण १६४ आमदार आहोत. या सर्व आमदारांच्या समर्थनाचे पत्र आम्ही राज्यपालांना सोपवले आहे. तसेच सत्तास्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी कधी असेल, याची माहिती राज्यपाल देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नितीश कुमार यांनी सत्तास्थापनेचा दावा करण्याआधी भाजपासोबतच्या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मंगळवारी (९ ऑगस्ट) आपल्या सर्व आमदारांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेत मुख्यमंत्रिपादाचा राजीनामा दिला. नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलाशी महागठबंधन करून पुन्हा एकदा सरकार स्थापणार आहेत.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *