Breaking News

भाजपा म्हणते, उध्दव ठाकरे सोबत पाचवा दिसणार नाही… दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर केली खोचक टीका

दसरा मेळाव्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाला परवानगी दिल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. वर्धा दौऱ्यावर बावनकुळे आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलताना उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.

यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘आपलं कुटुंब आपली जबाबदारी’ या शिवसेनेच्या घोषणेनुसार महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आपला मुलगा उपमुख्यमंत्री असंच चित्र दिसलं आहे. आताही मुंबईत कोणत्याही बॅनरवर फक्त चारच फोटो दिसत आहेत. पाचवा फोटोच दिसत नाही, अशी टीका केली.

उद्धव ठाकरेंनी काही लोकांनाच जवळ केल्याने त्यांना ४० आमदार आणि खासदार सोडून गेले आहेत. ‘आपलं कुटुंब आपली जबाबदारी’ एवढाच त्यांचा हेतू आहे, म्हणूनच उद्धव ठाकरेंसोबत आता कोणीही कार्यकर्ता उभं राहायला तयार नाही. एक दिवस त्यांच्या व्यासपीठावर केवळ चारच लोकं तुम्हाला दिसतील, पाचवी व्यक्ती दिसणार नाही. ही वेळ एकेदिवशी नक्कीच येणार आहे. कार्यकर्त्यांना संधी द्यायची वेळ आली तेव्हा मुलगा उभा झाला. कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपद द्यायची वेळ आली तेव्हा स्वतःच मुख्यमंत्री झाले असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री करेन, हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. बाळासाहेब ठाकरेंनी हयात असताना मनोहर जोशी, नारायण राणे यासारख्या नेत्यांना मुख्यमंत्री केलं. पण उद्धव ठाकरेंच्या हाती पक्ष येताच ते स्वतः मुख्यमंत्री झाले. यामुळेच शिवसेनेची अशी अवस्था झाली आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. ते वर्धा येथे पत्रकारांशी संवाद साधत हो

यावेळी बोलताना बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला आहे. नाना पटोले देवेंद्र फडणवीस यांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाहीत, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

नाना पटोले यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे बोनस कपात केले, धानाचे बोनस देऊ केले होते, ते दिले नाहीत असा आरोप केला होता. त्यावर बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या विकासाची एक टक्कासुद्धा बरोबरी नाना पटोले करू शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना वर्ध्यासह संपूर्ण महाराष्ट्राची इत्यंभूत माहिती आहे. संपूर्ण अभ्यास केलेल्या कार्यकर्ता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत, असल्याचे स्पष्ट केले.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *