Breaking News

भाजपा म्हणते, दिल्लीसह देशभरातील १९ ठिकाणच्या रामनवमी दंगली मागे काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी लिखित केला आरोप

१० एप्रिल रोजी रामनवमी दिनाच्या दिवशी नवी दिल्लीसह देशभरातील १९ ठिकाणी जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यावरून काँग्रेससह सर्व विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवित या हिंसाचारावर पंतप्रधान गप्प का? असा सवाल उपस्थित केला. यापार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी खुले पत्र लिहीत या हिंसाचारामागे देशातील इतिहास जमा होत असलेला विरोधी पक्षच (काँग्रेस) जबाबदार असल्याचा आरोप केला.
आज भारतात राजकारणाचे दोन भाग झालेले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे प्रयत्न आणि जे त्यांच्या कामातून दिसून येत आहेत. तर काही राजकिय पक्ष एकत्र येवून करत असलेले हे गलिच्छ राजकारण, जे त्यांच्या अतिशय निंदनीय बोलण्यातून दिसून येते. गेल्या काही दिवसात हे पक्ष एकत्र आलेले दिसत आहेत. (पण मनाने खरोखरच एकत्र आले आहेत का, हे आगामी काळात दिसून येईलच), त्याद्वारे राष्ट्र भावनेवर हल्ला केल्याचा आरोप केला.
या सर्व नाकारलेल्या आणि दुखावलेल्या राजकिय पक्षांना एक आठवण करून द्यायची आहे की, तुम्ही मतपेढीच्या राजकारणावर बोलत आहात, तर तुम्ही करोल, राजस्थान इथे जे झाले ते का विसरलात? या घटनेवर तुमच्या गोटात असलेल्या भयान शांततेचे कारण काय ? नोव्हेंबर १९६६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संसदेबाहेर बसलेल्या साधूंवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. हे साधू आपली गोहत्येवर बंदी घालण्याची मागणी घेवून दिल्लीला आले होते. आणि राजीव गांधीचे कुप्रसिध्द शब्द, जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा जमीन हादरतेच कोण विसरू शकेल, या वाक्याने इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या हजारो शिखांच्या हत्याकांडाचे त्यांनी समर्थन केल्याचेही त्यांनी आपल्या निवेदनात सांगितले.
गुजरात १९६९, मुरादाबाद १९८०, भिवंडी १९८४, मेरठ १९८७, काश्मीर खोऱ्यात १९८० च्या दशकात हिंदू विरोधात झालेला हिंसाचार भागलपूर १९८९, हुबळी १९९४ … काँग्रेस सत्तेत असताना झालेल्या हिंसाचाराची यादी फार मोठी आहे. मुझफ्फरनगरला २०१३ मध्ये आणि आसाममध्ये २०२१ ला झालेले दंगे तेव्हा सत्तेत कोण होते ? असा सवालही त्यांनी केला.
काही राजकिय पक्ष मतपेढीच्या राजकारणातून कधीच बाहेर निघू न शकणारे आता त्यांचे कुटील डाव सर्व बाजूने उघडे पडत असताना मूळापासून हादरले आहेत. अनेक दशके उघडपणे समाजविरोधी, लोकविरोधी प्रवृत्तींना समर्थन दिले, आता याच समाजकंटकांचा कायद्याने बंदोबस्त होत असताना होत आहे म्हणून अशांना पाठीशी घालणाऱ्या पक्षांमध्ये कमालीची घबराहट पसरली आहे आणि म्हणून ते अशा विचित्र प्रकारे वागत आहेत. ज्या राजकिय पक्षांनी इतकी दशके देशावर राज्य केले ते सगळे आता इतिहास होण्याच्या स्थितीत का आले आहेत, याचं विरोधी पक्षांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Check Also

बाळासाहेब थोरात म्हणाले, २४ तासात भाजपाचे तीन नेते राज यांना भेटले यावरून संकेत स्पष्ट… पूर्वीचे लाव रे व्हिडीओ म्हणणारे राज ठाकरे खरे होते

जवळपास एक वर्षापासून भाजपा आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या ज‌वळकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपाची युती …

Leave a Reply

Your email address will not be published.