Breaking News

भारतीय कुस्ती फेडरेशनने पत्र पाठवित बृजभूषण सिंग यांना दिली क्लीनचीट केंद्रीय क्रिडा मंत्रालयाला पाठविले पत्र फेटाळले आरोप

मुंबईमध्ये आलेल्या उत्तर भारतीयांना मारहाण केल्याच्या मुद्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपाचे खासदार तथा भारतीय कुस्ती फेडरेशन अध्यक्ष बृजभूषण सरण सिंग हे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला हजेरी लावली. तसेच राज ठाकरे आणि आपल्यात वैयक्तीक वाद नसल्याचे पुण्यात जाहिर केले. त्यानंतर लगेचच हरयाना आणि दिल्लीतील काही मल्लांनी बृजभूषण सरण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत कारवाईची मागणी केली. त्यावर आज भारतीय कुस्ती फेडरेशनने केंद्रिय क्रिडा मंत्रालयाला पत्र पाठवित बृजभूषण यांना क्लीनचीट दिल्याची माहिती पुढे येत आहे.

टोकियो ऑलम्पिकमध्ये पदक जिंकणारा बजरंग पुनिया आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगाट यांच्यासह देशातील अनेक कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केले. विनेश फोगाट हीने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत प्रशिक्षकही महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण करतात, असा खळबळजनक आरोप केला.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अशाप्रकारे अंदोलनाच्या पवित्र्यात उतरल्याने क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी ७२ तासांच्या आत उत्तर देण्याचे आदेश भारतीय कुस्ती फेडरेशनला (WFI) दिले. यानंतर कुस्ती महासंघाने आज क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहिलं असून महिला कुस्तीपटूंनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) शनिवारी क्रीडा मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, आम्ही लैंगिक छळाच्या एकाही आरोपाचा स्वीकार करत नाही. कुस्ती फेडरेशनच्या लैंगिक छळ समितीकडे अशा प्रकारची कोणतीही तक्रार यापूर्वी कधीही आली नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणतेही सत्य आढळत नाही. असे आरोप होणं दुर्भाग्यपूर्ण आणि निराधार आहेत असे कुस्ती फेडरेशनने आपल्या पत्रात नमूद केले.
कुस्ती फेडरेशनने पुढे म्हटलं की, भारतीय कुस्ती महासंघ हे सरकारचे धोरण, नियम, कायदे, सूचना इत्यादींद्वारे चालते. कुस्ती फेडरेशनचा अध्यक्ष किंवा इतर कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक इच्छा आणि आवडीनुसार ही संस्था व्यवस्थापित केली जात नाही. आंदोलक कुस्तीपटूंनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप हे वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा डब्ल्यूएफआयची बदनामी करण्यासाठी रचलेल्या मोठ्या कटाचा भाग असल्याचा प्रत्यारोपही कुस्ती फेडरेशनने पत्राद्वारे केला.

WFI चे व्यवस्थापन हे घटनेनुसार निवडून आलेल्या लोकांद्वारे चालवलं जातं. त्यामुळे WFI मध्ये अध्यक्षांसह इतर कोणत्याही पदाधिकाऱ्याद्वारे वैयक्तिकरित्या कोणतीही मनमानी कारभार केला जाऊ शकत नाही, असा खुलासाही कुस्ती फेडरेशनने आपल्या पत्रात केला.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *