Breaking News

ओबीसीप्रश्नी पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मात्र निशाणा या मंत्र्यांवर ओबीसींसाठींच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या शोधासाठी टास्कफोर्स स्थापणार का? मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील ओबीसींचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळातील दिग्गज मंत्र्यांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळ उपस्थिती स्थापन केली. या समितीची स्थापना होवून एक वर्ष झाला असून या वर्षभरात ही समितीचं अदृष्य होवून हरवली असल्याने या उपसमितीच्या शोधासाठी एखाद्या टास्क फोर्सची स्थापना करणार की आम्ही प्रत्येक पोलिस ठाण्यात तशी तक्रार दाखल करू असा खोचक सवाल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केला.

तसेच या पत्रातून मंत्री छगन भुजबळ, डॉ.जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, माजी मंत्री संजय राठोड, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

या मंत्रिमंडळ उपसमितीत महाविकास आघाडीतील ओबीसींसाठी आणाभाका घेणाऱ्या मंत्र्यांचा समावेश आहे. या समितीचे अध्यक्ष छगन भुजबळ हे आहेत. तर सदस्य आणखीनच दिग्गज असलेले गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री संजय राठोड, मंत्री गुलाबराव पाटील आदी दिग्गजांची मांदियाळी या समितीत आहे. तरीही या समितीने वर्षभरात कोणता अभ्यास करून अहवाल सादर केला हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे ही निष्क्रीय असलेली समिती सध्या अदृष्य झालेली असल्याचा खोचक टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर इतर मंत्र्यांना लगावला.

या निष्क्रीय दिग्गजांची समिती अदृष्य व हरविलेली असून तिच्या शोधासाठी आपण मुख्यमंत्री महोदय एखादा टास्क फोर्स नेमाल काय? असा सवालही करत अन्यथा ओबीसी जनतेकडून प्रत्येक पोलिस ठाण्यात दिग्गजांची निष्क्रीय समिती गरविली असल्याची तक्रार देवू असा इशारा त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना दिला.

गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना हेच ते लिहिलेले पत्र:-

Check Also

अखेर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अधिकार मंत्रिमंडळाकडेच मंत्रिस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत

अर्धन्यायीक प्रकरणे वगळता मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत. हे सर्व अधिकार पूर्वीप्रमाणेच …

Leave a Reply

Your email address will not be published.