Breaking News

सांगलीचे पालक मंत्री पाटील आणि पवार यांच्याकडून माझ्यावर जीवघेणा हल्ला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आरोप

मराठी ई-बातम्या टीम

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि पवारांनी माझ्यावर ३०० ते ४०० जमावाच्या माध्यमातून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून त्यावेळी आटपाडी पोलिसांकडून सदरच्या जमावावर कारवाई करण्याऐवजी त्याचे चित्रिकरण करत होते असा खळबळजनक आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालक मंत्री जयंत पाटील आणि पवारांवर एका व्हिडिओच्या माध्यमातून केला.

गोपीचंद पडळकर यांनी आज सकाळी एक व्हिडिओ जारी केला असून त्या व्हिडिओमध्ये एका चौकात एकाबाजूला एक डंपर उभा असून त्याच्यासमोर काही लोक लाठ्या वगैरे घेवून त्याच्या विरूध्द दिशेला दगडफेक करताना दिसत आहेत. तर दुसऱ्याबाजूला असलेल्या रस्त्यावरून एक पांढऱ्या रंगाची गाडी (फॉरर्च्युनर बहुधा) भरधाव वेगाने जाताना दिसत असून त्या गाडीवर तेथील जमावाकडून दगडफेक करताना दिसत आहे. त्याचबरोबर याच व्हिडिओमध्ये दोन-तीन पोलिस कर्मचारी दिसत असून त्यातील एकाने हातातील मोबाईलद्वारे त्या जमावाकडून करण्यात येत असलेल्या कृत्याचे चित्रिकरण करत असल्याचे दिसत असून ती पांढऱ्या रंगाची गाडी येताना बरोबर त्याच्या विरोध्द बाजूने उभा असलेला डंपर पुढे नेताना दिसत आहे.

या व्हिडिओच्या माध्यमातून पडकळकर यांनी सांगितले की, हा जो व्हीडीओ आपण पाहिला तो ७ नोव्हेंबर २०२१ रोजी माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा आहे. सदर हल्ला आटपाटी पोलीस चौकीच्या दारामध्ये झालेला आहे. आणि आपल्याला दिसलेही असेल की हल्ला किती सुनियोजित होता. माझी गाडी ज्या दिशेने येत होती. त्याच्या दुसऱ्या बाजूने दोनशे लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडं फेकायची मग माझ्या गाडीची स्पीड कमी होताच भरधाव वेगाने ट्रक अंगावर घालायचा. आणि मग जमावाकडनं हमला करवून घ्यायचा असा सुनियोजित हा कट आखला होता असा दावा त्यांनी केला आहे.

आणि आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण करताना पाहायला मिळतात. हा सगळा कट पोलीसांच्या संरक्षणात घडवून आणला जातोय. आणि सदर घटना थांबविण्यापेक्षा चित्रिकरणात मग्न आहेत असा आरोपही त्यांनी केला.

या हल्ल्याच्या कटात जिल्हायाचे एस.पी दिक्षित कुमार गेडाम, ॲडीशनल एस.पी मनिषा डुबुले आणि  जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील पुर्णपणे सामिल आहेत. यांनी या  कारवाईच्या नावाखाली माझ्या बॅाडीगार्डलाच संस्पेंड केलं आणि उलट माझ्यावरच ३०७ अंतर्गत गुन्हा दाखलं केला. एसपी आणि ॲडीशनल एसपी यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळे मी बॅाडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कारण रक्षकच जर भक्षकात सामील असतील तर त्यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा. पण एकच सांगतो मी माझा पवार-पाटलांविरूद्धचा लढा चालूच ठेवील असा इशाराही त्यांनी यावेळी या व्हिडिओच्या माध्यमातून दिला.

Check Also

पडळकरांचा मंत्री वडेट्टीवारांना टोला, “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” ओबीसी विभागासाठी फक्त साडेचार कोटी दिले

मराठी ई-बातम्या टीम   ओबीसी मंत्री विजय वडेडट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *