Breaking News

अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे पडळकर, खोतांनी केले प्रतिकात्मक लोकार्पण नियोजित कार्यक्रम शरद पवारांच्या हस्ते २ एप्रिलला

सांगलीतील नव्याने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या प्रतिकात्मक लोकार्पणावरून आज भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक लोकार्पण केले. या पुतळ्याचे लोकार्पण २ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पालक मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित होणार आहे. तत्पूर्वीच गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भूमिका घेत शेकडो कार्यकर्त्यांसोबत पुतळ्याच्या दिशेने कुच केली. मात्र तेथे पोलिसांचा मोठा फौज फाटा असल्याने पुतळ्याच्या जवळपासही भाजपाच्या कार्यकर्त्यांना जाता आले नाही. अखेर ड्रोणच्या माध्यमातून पुतळ्यावर पुष्पवृष्टी करत प्रतिकात्मक लोकार्पण केले.

दरम्यान पोलिसांनी चार-आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

पडकळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह धनगर समाजातील शेकडो कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरले होते. यामुळे मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता.

राष्ट्रवादा काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यास आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. पाच मेंढपाळांच्या हस्ते या लोकार्पण केले जावे, अशी त्यांनी मागणी लावून धरली होती व त्यानुसार लोकार्पणासाठी ते पुतळ्याकडे जात असताना त्यांना पोलिसांनी मल्हारराव चौकात रोखून धरल्याने बराचवेळ गोंधळ सुरू होता. अखेर आम्ही अहिल्यादेवींच्या पुतळ्यावर मेंढपाळाच्या हस्ते ड्रोनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी केली असल्याचे सांगत, पडळकर यांनी लोकार्पण झाले असल्याची माहिती माध्यमांना दिली. यावेळी उपस्थिती कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून व झेंडे फडकावून आनंदोत्सव साजरा केला. शिवाय, घोषणाबाजी देखील केली.

आता आपण डिजिटल इंडियामध्ये वावरतो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणं आहे की डिजिटल इंडिया झाला पाहिजे. पोलीस प्रशासन आज आम्हाल विरोध करत आहे. महिला पोलिसांना समोर करण्यात आले, म्हणजे आमचा त्यांच्यासोबत वाद झाल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल करता येतील. परंतु मेंढपाळाच्या हस्ते ड्रोनमधून गुलाबाची फुलं अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावरती टाकून हा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे. आमचा हेतू स्पष्ट होता तो पूर्ण झाला. आम्ही मेंढपाळाच्या हस्ते डिजिटल इंडियामध्ये ड्रोनचा वापर करून, आम्ही त्या स्मारकावरती फुलं टाकली उद्घाटन केलं. पोलिसांशी संघर्ष केला नाही. सरकार जरी चुकीचं वागलं तरी आम्ही चुकीचं वागणार नसल्याचे ते म्हणाले.

सांगली महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या अहिल्यादेवी स्मारकाच्या लोकार्पणावरून भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा उघड संघर्ष निर्माण झाला असून शरद पवारांच्या हस्ते होणाऱ्या या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यास विरोध दर्शविला. तसेच त्यापूर्वीच लोकार्पण करण्याचा इशारा दिला होता.

महापालिकेने विजयनगर परिसरातील सुमारे ३० हजार चौरस फुटांच्या भूखंडावर अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारले आहे.  २०१० पासून या स्मारकाचे काम सुरू होते. आता ते पूर्ण झाले असून यासाठी अडीच कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. या जागेवर अहिल्यादेवींचे स्मारक, अतिथिगृह, वाचनालय इमारत उभारण्यात आले असून खुल्या जागेत बागही तयार करण्यात आली.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या हस्ते होणाऱ्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्याऐवजी स्वत:च केल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वीही पहिली कोविडची लाट ओसरली होती. त्यावेळीही शरद पवार यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे पश्चिम महाराष्ट्रात उद्घाटन होणार होते. त्यावेळीही पडळकरांनी दोन दिवस आधीच पुतळ्याचे अनावरण करून टाकले होते. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा प्रतिकात्मक अनावरण करत राष्ट्रवादीवर कढी करण्याचा प्रयत्न केला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *