Breaking News

१२ निलंबित आमदारः भाजपा आमदारानेचे दिले कोलीत आणि सभागृह अर्ध्या तासासाठी तहकूब भास्कर जाधवांनी उपस्थित केला हे १२ आमदारा सभागृहात घेतले कसे?

भाजपाच्या १२ निलंबित आमदारांच्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर याप्रश्नी विधानसभेत कोणत्याही पध्दतीचा ठराव किंवा प्रस्ताव न मांडताच हे आमदार विधानसभेत हजर राहण्यास सुरुवात केली. तसेच हे आमदार कामकाजात सहभागीही होवू लागले. त्यासंदर्भात कालपासून सभागृहात चर्चेला तोंड फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र आज या विषयाला भाजपाच्या आमदारानेच या चर्चेला तोंड फोडले. त्यावरून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सत्ताधारी आणि विरोधकांनी गोंधळाला सुरुवात झाली.

सकाळी नेहमीप्रमाणे विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरु झाला. मात्र प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याआधी मला बोलायलाच आहे असा आग्रह भाजपाचे योगेश सागर यांनी धरला. त्यावर संसदीय कार्यमंत्री अनिल परब म्हणाले की, वायकरांचे उत्तर दिल्यावर तुम्ही बोला, त्यावर भाजपाचे सदस्य उठून उभे राहून आरडाओरडा करायला लागले. या गोंधळाच योगेश सागर म्हणाले आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडून आलोय

योगेश सागर यांनी दिलेल्या या वाक्यावरच शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे यावरच बोलायलाचच आहे का असा सवाल करत? सर्वोच्च न्यायालयाने यांना आत घेतलेच कसे असा सवाल करत ? याविषयीचा ठराव सभागृहात आणला होता का? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालय आणि संसद व विधिमंडळ पालिका  यांच्यात कोण मोठे असा प्रश्न उपस्थित निर्माण झाला तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी संसद मोठी असल्याचे स्पष्ट केले होते. मणिपूरमध्ये २१ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यावेळीही सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळाच्या विरोधात आदेश दिले होते. तेव्हा भाजपा आणि सत्ताधारी बाकावरून सदस्य अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा व्हायला लागल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करत असल्याचे जाहीर केले.

Check Also

संजय राऊत म्हणाले; कोणीही असो, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही शिवसेनेचा उमेदवार देऊन निवडूण आणू

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांना शिवसेनेत आल्यानंतर उमेदवारी जाहिर करण्याची अट शिवसेनेकडून घालण्यात आली. …

Leave a Reply

Your email address will not be published.