Breaking News

औरंगाबाद नामांतरावरून मुनगंटीवार थोरातांना म्हणाले मग, तुम्ही का नाव बदलले… विधानसभेत मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अनिल परब यांच्या उपस्थित दिला इशारा

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभागृहाचे लक्ष्य वेधण्यासाठी औचित्याच्या मुद्याद्वारे भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचा पुण्यस्मरणाचा आज दिवस आहे. त्यामुळे १९८८ साली स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादेत झालेल्या विजयी सभेत औरंगाबादचे संभाजी नगर असे नामांतर करण्याची घोषणा केली. त्या विषयीचा प्रस्ताव आता तयार झाला असून सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्याकडे सध्या प्रलंबित आहे. त्यामुळे या सुदिनाचे औचित्य साधत औरंगाबादचे नामांतर करत असल्याची घोषणा करावी अशी घोषणा करावी अशी मागणी केली.

यावेळी सत्ताधारी बाकावरून औरंगाबादचे नामांतर करण्याचा प्रस्ताव तुम्ही का मान्य केला नाही? असा खोचक सवाल केला असता ते म्हणाले, संभाजी महाराजांच्या नावावरून कोणतेही राजकारण नाही, पक्षिय ध्येय-धोरणे नाहीत की कोणताही छुपा अजेंडा नाही. त्यामुळे हा विषय राष्ट्राभिमान आणि राज्याभिमानाशी संबधित आहे.

नामांतर करण्याचा विषय हा काही आपल्यासाठी नवा नाही. त्यामुळे हा विषय हाती घ्या असे आवाहन त्यांनी करत यासाठी केंद्र सरकारकडे जाण्याची गरज असेल तर मी स्वत: सोबत येवून तेथे मुक्काम करून हा विषय मार्गी लावू. जर हे काम झाले नाही तर मी आयुष्यभर निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा केली.

मला माहित आहे, दुर्जनाचा काळ सर्वाधिक चालतो. पण एकदा का सज्जन शक्ती जागृत झाली की मग काही खरे नाही असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांचा विरोध असल्याचे दिसून आले होते. तसेच ते म्हणाले होते की नुसते नाव बदलून काय होते. मग थोरात साहेब तुम्ही का विजय भाऊसाहेब थोरात असे नाव असलेले बाळासाहेब भाऊसाहेब थोरात असे नाव का बदलले असा सवालही त्यांनी यावेळी केला.

आदित्य ठाकरे येथे सभागृहात उपस्थित आहेत, मंत्री अनिल परब येथे आहेत. संभाजी महाराजांच्या आजच्या पुण्यस्मरणाच्या दिवसाचे औचित्य साधून त्यांनी औरंगाबादच्या नाव बदलाचा प्रस्ताव मान्य करत तशी घोषणा करावी अशी मागणी करत याविषयीची घोषणाही तुम्ही केली होती. त्यानुसार घोषणा करावी अशी मागणी केली.

नामांतराची घोषणा जर केलात जर तुम्ही सुर्यासारखे तळपत रहाल नाही तर अंधार झालाच म्हणून समजा असा इशारा देत स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या भाषणातील शब्दांचा सन्मान ठेवा असे आवाहनही त्यांनी केले.

त्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांकडून कोणतेच उत्तर न आल्याने अखेर भाजपाच्या सदस्यांनी संभाजी महाराज की जय, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

Check Also

नाना पटोले यांचा विश्वास, मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; पराभव अटळ

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *