Breaking News

नाना पटोले,’ त्या ‘ गुंडाची छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे खुले आव्हान

मराठी ई-बातम्या टीम  

‘मी पंतप्रधानांबद्दल बोललो नाही, माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो’ हा नाना पटोले यांचा खुलासा धादांत खोटारडेपणा आहे’ असा आरोप महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भांडारी ह्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.‘नाना पटोलेनी ह्या गावगुंडाचे छायाचित्र आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी असे आव्हानही भांडारी ह्यांनी दिले.

‘स्वत:च्या मतदारसंघात जनतेला त्रास देणाऱ्या गावगुंडाचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची भाषा सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष वापरत नाही, हे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे खरे चित्र आहे असे स्पष्ट करून माधव भांडारी ह्यांनी म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष कायद्याचे संरक्षण जनतेला देऊ असे न म्हणता कायदा झुगारून खून करण्याची भाषा वापरतो, ही वस्तुस्थिती भयावह असल्याचे त्यांनी सांगितले.

कायद्याचे राज्य ही कल्पनाच काँग्रेसला मान्य नाही आणि केवळ खूनखराब्याचे राजकारण करणे हाच काँग्रेसचा स्वभाव आहे हे आता स्पष्ट झाले आहे. केवळ हिंसाचारावर अवलंबून असणाऱ्या काँग्रेस संस्कृतीचे नाना पटोले हे अस्सल प्रतिक आहेत’ अशी टीका देखील  त्यांनी केली आहे.

दरम्यान, पटोले यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारले, तसेच त्यांच्या प्रतिमेला जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याने पोलिसांनी आमदार अतुल भातखळकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना ताब्यात घेतले.

नाना पटोले यांचा काल व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत नाही तर स्थानिक गावगुंड मोदीच्या विरोधात बोलल्याचा खुलासा केला होता. तसेच त्यावेळी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी असा उल्लेख केला नाही की पंतप्रधान असाही उल्लेख केला नाही. तरीही भाजपाचे लोक कारण नसताना त्या वक्तव्यावरून राजकारण करत असल्याचा प्रत्यारोप केला होता.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *