Breaking News

विद्यापीठ विधेयकातील “या” तरतूदींवरून मुनगंटीवारांचा सरकारला सवाल मंडळावरील सदस्यांच्या त्या गोष्टी कोण तपासणार?

मराठी ई-बातम्या टीम

विधानसभेत संध्याकाळी सार्वजनिक विद्यापीठ दुरूस्ती विधेयक मान्यतेसाठी आल्यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना चांगलेच धारेवर धरत या दुरूस्ती विधेयकातील त्या तरतूदींनुसार नियुक्त करण्यात येणार असलेल्या व्यक्तींची तपासणी कशी करणार असा सवाल यावेळी उपस्थित केला.

सार्वजनिक विद्यापीठ दुरूस्ती विधेयक मांडल्यानंतर त्यावरील चर्चेला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी विधेयकातील ६० ख या तरतूदीतील नियुक्ती विषयीचा पॅरा वाचण्यास सुरुवात केली. त्यातील पॅरानुसार प्रत्येक विद्यापीठात एक समान संधी मंडळ असेल, जे अध्यापक, अध्यापकेतर कर्मचारी आणि समाजातील दुर्बल घटकांचे विविध प्रवर्ग, अल्पसंख्याक, महिला, एलजीबीटीक्यआयए (समलिंगी संबध असणारी स्त्री (लेस्बीयन), समलिंगी संबध असणारा पुरूष (गे), उभयलिंगी संबध असणाऱ्या व्यक्ती (बाय सेक्शुअल, तृतीयपंथी, समलिंगी संभोगाचे आकर्षण असणारा पुरूष (क्यीर) आंतरलैगिंक, अलैंगिक व इतर) व दिव्यांग व्यक्ती यामधील विद्यार्थी यांचे कल्याण, विकास व सामाजिक सुरक्षा यांच्या संबधात विविध विकास व कल्याण कार्यक्रम, योजना, विनियम व धोरणे यांचे नियोजन करणे, संनियंत्रण करणे, त्याबाबत मार्गदर्शन करणे आणि त्याचे समन्वयन करणे, भारताच्या संविधानामध्ये जतन केलेल्या स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, समानता, समान संधी, प्रतिष्ठा व सामाजिक न्याय या मूल्यांना चालना देणे व ती प्रस्थापित करणे आणि तसेच विद्यापीठातील सर्वसमावेशक शिक्षणासाठी धोरण, कार्य पध्दती व प्रथा तयार करणे यासाठी जबाबदार असेल हा पॅरा वाचन दाखविला.

या पॅरातील एलजीबीटीक्यआयए (समलिंगी संबध असणारी स्त्री (लेस्बीयन), समलिंगी संबध असणारा पुरूष (गे), उभयलिंगी संबध असणाऱ्या व्यक्ती (बाय सेक्शुअल, तृतीयपंथी, समलिंगी संभोगाचे आकर्षण असणारा पुरूष (क्यीर) आंतरलैगिंक, अलैंगिक व इतर) या व्यक्तींची तपासणी कोण आणि कशी करणार असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित करत या तरतूदींचा समावेश करताना त्याच्या तपासणीबाबत मात्र काहीच तरतूद नसल्याबाबतचा मुद्दा उपस्थित करत हे कसे ठरविणार असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

त्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उत्तर देताना या तरतदींवर अधिक भाष्य करण्याचे टाळत कुलगुरू निवडताना सर्वबाबींचा विचार झाला पाहिजे या दृष्टीकोनातून ही दुरूस्ती करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *