Breaking News

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांनंतर आता भाजपा नेत्यांची पाळी?

मराठी ई-बातम्या टीम

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र यावेळी त्यांना ओमायक्रॉन या विषाणूची लागण झाली आहे. त्यांना सौम्य स्वरूपाची लक्षणे असून मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी त्या होम क्वारंनटाईन झाल्या असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

यासंदर्भात पंकजा मुंडे यांनीच स्वत:च माहिती दिली असून कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्याबरोबर मी विलग झाले असून चाचणीचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे लक्षणे आणि कोरोना दोन्ही आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.

नवं वर्षाचा पहिला दिवस आणि भीमा-कोरेगांव शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगांव येथे आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळातील १० मंत्री आणि २० आमदार कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती देत नागरीकांनी कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्याच्यादृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

विशेष म्हणजे राज्यातील मंत्री आणि २० आमदार हे हिवाळी अधिवेशन काळातच कोरोना बाधित झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मात्र हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भाजपा आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर त्यांनी स्वत:ला होम क्लारंटाईन घेतले.

दरम्यान, राज्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत असून त्यामुळे मागील तीन दिवसात जवळपास तीन पटीत रूग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. तुलनेने राज्याच्या इतर भागात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत नाही. त्याचबरोबर मुंबई, पुणे आदी भागात ओमायक्रॉन व्हेरियंट बाधित रूग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात मात्र सातत्य आहे. परंतु ओमायक्रॉन बाधितांची संख्या मर्यादीत स्वरूपाची आहे.

 

Check Also

भाजपा आमदार नितेश राणेंना उच्च न्यायालयाकडून धक्का आणि दिलासा २७ जानेवारी पर्यत अटक करता येणार नाही

मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय मत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा भाजपाचे आमदार नितेश राणे यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *