Breaking News

शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यावर फडणवीस म्हणाले… कोणत्याही नेत्यांच्या घरावर असा हल्ला चुकीचाच

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर चपला आणि दगडफेक करत आज एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या साऱ्या प्रकारामुळे सिल्व्हर ओकच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये चांगलाच गोंधळ आणि तणाव निर्माण झाला. या घटनेसंदर्भात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली असताना भाजपा नेते तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी हा हल्ला चुकीचा असल्याचे मत प्रदर्शित करत अशी आंदोलने एखाद्या मोठ्या नेत्याच्या घरापर्यंत जाणे समर्थनीय नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. फडणवीस यांनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिय व्यक्त केली. पवारांच्या घरासमोर झालेल्या गोंधळावर भाजपाकडून प्रतिक्रिया देणारे फडणवीस हे पहिले मोठे नेते आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
मात्र एकीकडे पवारांच्या घरासमोरील गोंधळाचा निषेध करतानाच दुसरीकडे फडणवीस यांनी सरकारचेही कान टोचलेत. गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. न्यायालयाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर परतण्याचे आदेश दिलेत. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचा काल निकाल आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी उस्तव साजरा केला. मात्र आज अचानक या कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पवारांच्या निवासस्थानी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. आणि सर्व आंदोलनकर्त्यांना दुपारनंतर जे.जे इस्पिस्तळात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले.

Check Also

भाजपा खासदार डॉ अनिल बोंडे, नवनीत राणा यांच्या लव्ह जिहादचा बार फुसका मुलीनेच दिला जबाब असा कोणताही प्रकार नाही

अमरावतीतील धारणी येथील एका हिंदू मुलीला मुस्लिम तरूणाने फुस लावून पळवून लावले. तसेच त्या मुलीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published.