Breaking News

दानवेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, राहुल गांधींना दिली या प्राण्याची उपमा देवाला सोडलेला वळू म्हणाल्याने राजकारणात उमटले पडसाद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील वादग्रस्त भाजपा नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केल्याने त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्यास सुरुवात झाली. जन आर्शिवाद यात्रा बदनापूर येथे पोहोचली असता त्यांनी काँग्रेसचे माझी अध्यक्ष तथा नेते राहुल गांधी म्हणजे देवाला सोडलेला वळू म्हणत नवा राजकिय वाद निर्माण केला आहे.

सध्या भाजपाची जनआर्शिवाद यात्रा सुरु असून दानवेंच्या मतदारसंघातील बदनापूर येथे दुपारी ही यात्रा आली. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी वरील वक्तव्य केले.

राहुल गांधी यांना सध्या काहीही काम नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण देवाला सोडतो, त्याप्रमाणे ते वागत असतात. वळूला काहीच काम नसते तो फक्त गावात इकडून तिकडे भटकत असतो, असे सांगत पुन्हा हे खरे आहे की नाही असा सवालही त्यांनी उपस्थित नागरीकांना केला.

यापूर्वीही दानवे यांनी कधी कांद्यावरून तर कधी अन्य गोष्टींवरून असेच वादग्रस्त वक्तव्य करत वाद ओढावून घेतला होता. आता पुन्हा त्यांनी या केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.

वास्तविक पाहिले तर दानवे हे वादग्रस्त वक्तव्य करण्यात पटाईत आहेत. अशी विधाने करताना त्यांची जीभ घसरली असे म्हणणे योग्य वाटणार नाही. त्यांना माहित आहे कोणत्या वाक्यामुळे त्यांच्या वाक्यांना टाळ्या मिळतात आणि जनता खुष होते. त्यामुळे त्यांची वाक्य ही जाणीवपूर्वक जाहिर कार्यक्रमांमध्ये मुद्दाम करण्यात येत असल्याचे मत स्थानिक पातळीवरील एका भाजपाच्याच नेत्यांने व्यक्त केले.

Check Also

दादरमध्ये एकनाथ शिंदे गटाकडून प्रती सेनाभवन शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर यांची माहिती

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये आता शिवसेनेत बंडाचे निशाण फडकाविलेल्या एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना भवनच्या धर्तीवर …

One comment

  1. धन दांडग्याची जी हुजुरी करणारा एक फेकू वळू चे ठेवलेले सामांन्य भारतीयांसाठी न्यायकाम करणारा आवडणारनाहींच. म्हणून फेकुचे आंडभक्त लायकीप्रमाने भुंकणारच.

Leave a Reply

Your email address will not be published.