Breaking News

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केली नेमणूक

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. तसेच त्यांनी मुंबई भाजपा अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मंत्री तथा मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे व आशिष शेलार यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

चंद्रशेखर बावनकुळे विधान परिषद सदस्य आहेत. ते नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी डिसेंबर २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी २००४, २००९ व २०१४ अशी तीनवेळा कामठी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. ते १९९७ व २००२ साली नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. सध्या ते पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांनी यापूर्वी भाजपा प्रदेश सचिव, नागपूर जिल्हाध्यक्ष, नागपूर जिल्हा सचिव आणि नागपूर जिल्हा भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यांनी १९९० ते १९९५ या कालावधीत अखिल महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त बेरोजगार समितीचे कार्य केले. कोराडी वीज प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिला होता व आंदोलनात अटक झाली होती.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *