Breaking News

पहिल्या विस्तारात डावलूनही बच्चू कडू म्हणाले, शब्द दिला होता पण… नाही मिळालं तरी चांगलं

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिक्षण राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी सेनेत बंडाचे निशाण फडकाविणाऱ्या एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दर्शवित त्यांच्यासोबत गेले. मात्र आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात बच्चू कडू यांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांना विचारले असता ते म्हणाले, होय एकनाथ शिंदे यांनी मंत्री पदाचा शब्द दिला होता. पण आता पुढील विस्तारात आपल्याला संधी मिळेल असे आता ते सांगत असल्याचे स्पष्ट करत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.

शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांच्या समावेशामुळे भाजपामधूनच विरोध होऊ लागला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून संजय राठोडांवर तीव्र शब्दांत टीका करताना संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मंत्रिपद नाही दिलं तर भांडायचं का? असं सवाल त्यांनी विचारला आहे. बच्चू कडू एवढ्या लहान विचांराचा नाही, असंही ते म्हणाले.

मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचारलं असता बच्चू कडू म्हणाले की, मंत्रिपद मिळालं तरी चांगलं आणि नाही मिळालं तरी चांगलं आहे. आमचा उद्देश केवळ मंत्रिपद मिळवणं हा नाही. मी एवढ्या लहान विचारांचा माणूस नाही. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला मंत्रिपदाचा शब्द दिला आहे. ते त्यांचा शब्द नक्की पूर्ण करतील असेही म्हणाले.

मंत्रिपद नाही मिळालं तरी चांगलं या बच्चू कडूंच्या विधानाबाबत प्रश्न विचारला असता, बच्चू कडू म्हणाले की, मंत्रिपद नाही दिलं तर त्यांना भांडायचं का? तेही स्वत: साठी भांडायचं का? शेतकऱ्यांसाठी भांडू की… मी काही कॅबिनेटपेक्षा कमी नाही. बच्चू कडू अकेलाही काफी है, सब के लिए… असेही ते म्हणाले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *