Breaking News

ओबीसीशिवाय “या” १४ महापालिकांच्या आरक्षण सोडत आणि हरकतींचा कार्यक्रम जाहिर ३१ मेला होणार आरक्षणाची सोडत

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागातील अनुसूचित जाती-जमाती आणि महिला आरक्षणाचा कार्यक्रम पूर्ण करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह १४ महापालिकांना आदेश दिले. विशेष म्हणजे अन्य राखीव प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करून येत्या ३१ मे रोजी या राखीव प्रवर्गासाठी सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना दिले.
राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून जोपर्यंत राज्य सरकार ओबीसी जनगणनेची त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गासाठी प्रभाग राखीव ठेवता येत नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ओबीसींच्या आरक्षांशिवाय होणार आहेत हे स्पष्ट झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मुंबई, नवी मुंबई, वसई- विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हसनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना अंतिम झाली असून ती राजपत्रात प्रसिध्द झाल्याचेही आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने संबंधित महापालिकांना दिला आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती, आणि अनुसूचित जमतीसाठीच्या राखीव प्रवर्गासाठी अंतिम प्रभाग रचनेनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचा उतरता क्रम विचारात घेणे आवश्यक असून त्यानुसार आरक्षण सोडत काढण्यात यावी, असे या आदेशात स्पष्ट कऱण्यात आले आहे.
अनुसूचित जाती आणि जमाती आरक्षण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण चक्राकार पध्दतीने २७ मे रोजी जाहिर करण्याची मुदत देण्यात आली आहे. तर आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी ३१ मे ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय निश्चित करण्यात आलेल्या जागांची माहिती प्रसिध्द करण्यासाठी १ जून हि तारीख निश्चित करण्यात आली असून त्यावरील हरकती व सूचना मागविण्यासाठी १ ते ६ जून पर्यंत मागविण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानंतर आलेल्या हरकती व सूचनांवर निर्णय घेवून त्याबाबतचा अंतिम निर्णय १३ जून रोजी राजपत्रात जाहिर करण्याचे आदेश आयोगाने या १४ महापालिकांना दिले.

१३ महापालिकांना आरक्षण सोडत कार्यक्रम घेण्यासाठी पाठविण्यात आलेले पत्र खालील प्रमाणेः

मुंबई आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडण्यासाठी पाठविण्यात आलेले पत्र खालील प्रमाणेः

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *