Breaking News

राज ठाकरेंच्या आदेशाबर भोंगा लावणाऱ्या मनसैनिकाला पोलिसांनी दंड ठोठावत दिली नोटीस पाच हजाराचा दंड आणि परत लावल्यास अटकेची नोटीस बजावली

मस्जिदींवरील भोंगे काढण्याची भाजपाची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उचलून धरत ज्या मस्जिदीवर मोठे भोंगे काढणार नाहीत त्या मस्जिदसमोर मोठे भोंगे लावून हनुमान चालिसा लावा असे आदेश काल मनसेच्या गुढी पाढवा मेळाव्यात मनसैनिकांना दिल्यानंतर मुंबईच्या घाटकोपरमध्ये मनसैनिक असलेल्या महेंद्र भानुशाली यांनी चिरागनगर येथील मनसे कार्यालया बाहेर भोंगे लावले. यानंतर मुंबई पोलिसांनी या मनसैनिकावर कारवाई करत भोंगे उतरवित पाच हजाराचा दंड आणि नोटीस बजावली.

सुरुवातीला मुंबई पोलिसांनी सदर मनसैनिकाला लावण्यात आलेले भोंगे काढण्याची सूचना करण्यात आली. परंतु मनसैनिकाने सदरचे भोंगे उतरविण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी स्वत: ते भोंगे उतरवून जप्त केले. तसेच या कृत्याबद्दल भानुसाली यास ५ हजाराचा दंड आणि नोटीस बजावली.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना मनसैनिक महेंद्र भानुशाली याने, मला जर उद्या पुन्हा भोंगे मिळाले तर मी परत लावेन असे सांगत पोलिसांनी मला पाच हजाराचा दंड आणि नोटीस दिल्याचे सांगितले.

कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता भोंगे लावल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेवरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाकडून ही कारवाई करण्यात आल्याची भावना मनसे कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

राज ठाकरे सभेत बोलताना म्हणाले, “कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा असे आवाहनही त्यांनी केले होते.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *