Breaking News

अंजली दमानिया यांनी उघड केले धनंजय मुंडे -वाल्मिकी कराड यांच्यातील संबध सात-बाराचे उतारे दाखवित जमिनीही दोघांच्या नावावरः सर्वाधिक पिस्तुलाचे परवाने बीडमध्ये

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वाल्मिकी कराड यांचे नाव पुढे आले. त्यानंतर वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे हितसंबधही उजेडात आले. त्यासाठी पंकजा मुंडे यांनीच दसरा मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांचे पानही ज्याच्याशिवाय हलत नाही ते वाल्मिकी कराड असे सांगत धनंजय मुंडे आणि वाल्मिती कराड यांच्यातील संबध जगजाहिर केले. त्यातच मस्साजोगचे सरपंच वाल्मिकी कराड यांचे नाव आल्याने वाल्मिकी कराड यांच्यासोबतच धनंजय मुंडे यांचे नावही घेण्यात येऊ लागले. त्यामुळे वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे संबध कसे असतील असा तर्क-वितर्क लढविले जाऊ लागले. मात्र धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्यातील संबधाचे जाहिर पुरावे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी उघडकीस आणले.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या एक्स वरील ट्विटर हॅण्डलवर धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्यातील आर्थिक हितसंबध इतके ठळक आहेत की, ज्या जमिनी खरेदी करण्यात आल्या त्या जमिनीही धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यां दोघांनी मिळून खरेदी केलेल्या आहेत. त्याचबरोबर जग्नमित्र शुगर मिल्स साठी खरेदी करण्यात आलेल्या जागेच्या अर्थात जमिनीच्या सातबाराच्या उतारऱ्यावरही धनजंय मुंडे यांच्याबरोबर वाल्मिकी कराड आणि सुर्यभान मुंडे यांचे नाव आहे.

त्याचबरोबर बीड जिल्ह्याला लागू असलेल्या नांदेड-परभणी जिल्ह्यात जेमतेम ३२ जणांना पोलिसांकडून शस्त्रास्त्राचे परवाने देण्यात आले आहेत. तर अमरावतीत २४३ जणांना शस्त्रास्त्र परवाने देण्यात आले आहेत. परंतु बीड जिल्ह्यात सर्वाधिक १२२२ अधिकृत शस्त्रास्त्रांचे परवाने देण्यात आले असून यात वाल्मिकी कराड याचेही नाव आहे. तसेच सरपंच संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणी आरोपींच्या यादीत नाव असलेल्या आणखी एकाचे नाव असून त्यालाही शस्त्रास्त्र परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे एकट्या बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्तांचे परवाने का देण्यात आले असा सवालही यावेळी अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.

दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिकी कराड याचे नाव पुढे आल्यानंतर त्यासंदर्भात धनजंय मुंडे यांच्याकडून खास कोणतीही प्रतिक्रिया पुढे आली नाही. त्यातच याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असे इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *