मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराड आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी यांच्यातील घनिष्ठ संबधाचा पर्दापाश सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. त्यानंतर अंजली दमानिया यांनी माजी कृषी मंत्री आणि विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या भ्रष्टाचाराचा पुरावा सादर करणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करत राजीनामा घ्याच अशी मागणीही यावेळी केली.
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या सांगताना म्हणाल्या की, एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे किती आणि कसे खातोव कायदे कस पायदळी तुडवतो याचे पुरावे मी देणार आहे. लाभ हस्तांतर योजनेतील सरकार जे पैसे देते त्या योजनांचा दुष्यपरिणाम होतोय. त्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांनापर्यंत पोहोचत नाही, म्हणून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो असा दावाही करत कृषी खात्यातील भ्रष्टाचाराची पोलखोल केली.
पुढे आरोप करताना अंजली दमानिया म्हणाल्या की, नॅनो युरिया, नॅनो डिएपी, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्याच्या बॅगा यात कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत त्याची कागदपत्रे दाखवत पुढे म्हणाल्या की, हे उत्पादन विकत घेण्यासाठी धनंजय मुंडे यांनी वाढीव पैसे आकारले. हि उत्पादने इफ्को नावाच्या कंपनीची आहेत. नॅनो युरियाचा दर १८४ प्रती लिटर आहे. म्हणजे ५०० एमएल लीटर बाटलीचा दर ९२ होतो. पण मुंडे यांनी यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं त्यात २२० रूपये प्रती लिटरच्या दराचे पैसे आकारण्यात आले. संगल बॉटर बाजारात ९२ रूपये मिळते, पण धनंजय मुंडे यांनी १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटल या २२० रूपये दराने खरेदी करत मुळ किंमतीच्या दुपट किंमतीने खरेदी केल्याचा आरोपही यावेळी केला.
अंजली दमानिया पुढे बोलताना म्हणाल्या की, नॅनो डीएपीची किंमत ५२२ रूपये प्रती लिटर आहे. म्हणजे ५०० मिली लिटरची बॉटल ही केवळ २६९ रूपयांना मिळते. एकूण बॉटल १९ लाख ५७ हजार ४३८ घेतल्या. परंतु कृषी मंत्र्यांनी डिएपीची प्रती बॉटल ५९० रूपयांना खरेदी केली. हे दोन्ही घोटाळे ८८ कोटींचे असल्याचेही यावेळी सांगितले.
कृषी खात्यासाठी धनंजय मुंडे यांनी आणखी एक वस्तू खरेदी केलेल्या बाबत बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, बॅटरी स्पेअर हा टू इन वन आहे. एमएआयडीच्या वेबसाईटवर हा स्पेअर मिळतो, तो २४५० रूपयांना मिळतो. एमएआयडीच्या वेबसाईटवर २४४६ रूपयांना विकला जातो. कृषी मंत्र्यांनी या वस्तूचे टेंडर काढलं त्यात ही बॅटरी ३४२६ रूपयांना विकत घेतली. एक हजाराच्या बॅटरीवर एक बॅटरी स्पेअर कमावले, असल्याचे सांगत डीबीटीच्या योजनेत ५ लाखाहून अधिक लाभार्थी होणार होते. यासाठी बजेटही ठरलं होतं. पण उत्पादनांच्या किंमती जास्त दाखवून कमी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.
अंजली दमानिया पुढे बोलताना म्हणाल्या की, गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस आणि सोयाबीनचे नुकसान होते. मेटाल्डे हाइड हे पीआयए कंपनींचे पेटेंड उत्पादन आहे. हे उत्पादन बल्क मध्ये घेतल्यास स्वस्त मिळतं, रिटेलमध्ये आता ते उत्पादन ८१७ रूपयांना मिळतं. परंतु कृषीमंत्री धंनजय मुंडे यांनी मेटाल्डे हाइड हे उत्पादन १२७५ रूपयाला विकत घेतलं. एकूण १ लाख ९६ हजार ४४१ किलो विकत घेतलं. कॉटन स्टोरेज बॅग ६ लाख १८ हजार घेतल्या. काही दिवसांपूर्वी आयसीएआय नावाची संघटना आहे. त्यांनी २० बॅगा घेतल्या. त्या ५७७ रूपयांना पडल्या पण धनंजय मुंडे यांनी टेंडरमधून १२५० रूपयांना प्रति बॅग घेतली. एकूण ३२४ कोटींच्या टेंडरमध्ये १६० कोटी रूपये सरळ सरळ गेले असा आरोपही यावेळी केला.
शेवटी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, हे सर्व दर हे ऑनलाईन असलेले दर सांगतेय दर रिटेलचे आहेत. पण उत्पादने बल्कने घेतली तर २० टक्के अधिक आहेत. इतके महान कृषी मंत्री आहेत असा उपरोधिक टोला लगावत हे धनंजय मुंडे हे एकच वर्ष पदावर होते. एका वर्षात एका मंत्र्याने इतका अफाट पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्री पदावर ठेवण्याची गरज आहे का असा सवाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावाच अशी मागणीही यावेळी केली.