Breaking News

अनिल परबांनी ईडीला सांगितले आज नाही १४ दिवसांनी येतो नेमकं कोणत्या प्रकरणावरून बोलाविले याची माहिती नाही

मुंबई: प्रतिनिधी

भाजपाच्या जन आर्शिवाद यात्रेचा समारोप झाल्यानंतर संध्याकाळी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने २९ ऑगस्ट रोजी नोटीस बजावत मंगळवारी ११ वाजता चौकशीला हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र अनिल परब हे ईडी कार्यालयात आज पोहचले नाहीत. तसेच त्यांनी चौकशीला हजर होण्यासाठी १४ दिवसांची मुदत मागितली असून तशी मुदत ईडीनेही त्यांना दिल्याची माहिती पुढे आली आहे.

आपण मंत्री असल्याने पुढील १४ दिवसांच्या कार्यक्रमांच्या नियोजन झालेले असल्याने आपणाला १४ दिवसांची मुदत द्यावी. त्यानंतर आपण चौकशीला हजर राहू शकतो असे पत्राद्वारे कळविले. त्यास ईडीनेही मंजूरी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

परब यांनी ईडीला एक पत्र पाठवून आज चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नसल्याचं कळवले. मंत्री असल्यामुळे आजचे कार्यक्रम अगोदरच ठरले आहेत. ते रद्द करता येणार नाहीत. त्यामुळे मला १४ दिवसांचा अवधी देण्यात यावा, असं परब यांनी ईडीला सांगितले. ईडीनेही परब यांचे पत्र स्वीकारले आहे.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी परब यांना आलेल्या नोटीसीवरून प्रतिक्रिया देताना म्हणाले की, परब यांना ईडीने नोटीस दिली असली तरी परब आज ईडी समोर हजर होणार नाहीत.

परब यांना ईडीची नोटीस आलेली असतानाच परब यांना दुसरा धक्का बसला आहे. परिवहन खात्यातील परब यांच्या मर्जीतील एका अधिकाऱ्याच्या घरावर ईडीने धाडी मारल्या आहेत. या धाडीत ईडीच्या हाती काय कागदपत्रे लागली याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहे. बजरंग खरमाटे असं या अधिकाऱ्याचे नाव असून ते नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी आहेत. ते परिवहन मंत्री अनिल परब यांचे जवळचे मानले जातात.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *