Breaking News

अंबादास दानवे यांची मागणी, खासगी बसेस खरेदी स्थगितीची अधिकृत सूचना काढा भाडेतत्वावरील बस खरेदीच्या नावाखाली सरकारला लुटण्याचा प्रयत्न

राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाकडून १३१० खासगी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री यांनी स्थगिती देऊन चौकशी करण्याचे वृत्त प्रकाशित झाले असले तरी याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत सूचना काढली नाही. त्यामुळे सरकारने या बसेसच्या स्थगिती व चौकशीबाबत अधिकृत सूचना काढावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, भाडेतत्त्वावर खासगी बस खरेदीच्या नावाखाली सरकारला लुटण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून केला जातोय, असा गंभीर आरोप करत यात २ हजार ८०० कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोपही यावेळी केला.

अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, भाडेतत्वावरील बस खरेदीचे मे. अँथोनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्युशन प्रा. लि., मे. सिटी लाइफलाइन ट्रॅव्हल्स प्रा.लि. आणि मे. ट्रॅव्हल टाइम प्रा. लि. या तीन कंपन्यांना कंत्राट दिले असून या दिल्ली, गुजरात तामिळनाडूच्या कंपन्या असल्याचे सांगत प्रति वर्ष २ हजार ८०० कोटी रुपयांचा भुर्दंड सरकारला बसणार आहे. सरकारने या निर्णयाला स्थगिती देताना पुन्हा एकदा याच्या जास्त पेक्षा दर येऊ नये, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना अशाप्रकारे उधळपट्टी होऊ नये अशी मागणीही यावेळी केले.

सरपंच हत्येचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवावा-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चाललावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

वाल्मिक कराड याचा खटला चालविण्यासाठी सरकारी वकील एस. एस. देशपांडे यांनी नकार का दिला याचीही चौकशी झाली पाहिजे. तसेच या प्रकरणात चौकशीसाठी स्वतंत्र वरिष्ठ अधिकारी यांची नेमणूक करावी, अशी मागणीही दानवे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *