Breaking News

पराभव नको म्हणून काँग्रेस मध्ये गेलेला नेता आणि विद्यमान १३ मंत्री अखेर पराभूतच भाजपाला ५० हून अधिक जागी पराभव

लोकसभा निवडणूकीला आणखी वर्ष राहिलेला असला तरी देशातील संपूर्ण राजकारणाचा मूड सेट करणाऱ्या कर्नाटक विधानसभेची निवडणूकीचा निकाल आज जाहिर झाला. या निवडणूकीत भाजपाचा दारूण पराभव करत काँग्रेसने १३६ ठिकाणी विजय मिळवित एकहाती सत्ता हस्तगत केली. निवडणूकीच्या आधीच बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार चांगलेच बदनाम झाले. त्यामुळे भाजपाच्या विद्यमान सरकारमधील १३ मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर भाजपाच्या तिकिटावर पराभव नको म्हणून काँग्रेसमध्ये गेलेल्या जगदीश शेट्टार यांनाही पराभवाचा सामना करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची आज १३ मे रोजी मतमोजणी सुरू आहे. दुपारी ५ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार कर्नाटकात काँग्रेस १२९ जागांवर विजयी झाली असून ७ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा ६० ठिकाणी विजयी झाली असून ५ ठिकाणी आघआडीवर आहे आणि जेडीएसला केवळ १९ जागांवर विजय मिळवला आहे. तसेच २ जागांवर अपक्ष आणि २ जागांवर इतर पक्षांच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. या निवडणूकीत भाजपाच्या ताब्यातील जवळपास ५० विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने खेचून घेतले आहेत.

भाजपाचे पराभूत मंत्री
. मुधोला विधानसभा मतदार संघ
गोविंदा करजोला पराभूत, आरबी थिम्मापुरा विजयी

२. बेल्लारी ग्रामीण विधानसभा मतदार संघ
श्रीरामुलु पराभूत, बी नागेंद्र विजयी

३. वरुणा विधानसभा मतदार संघ
व्ही. सोमण्णा पराभूत, सिद्धारमैय्या विजयी

४. कामराजनगर विधानसभा मतदार संघ
वी सोमन्ना पराभूत, पुट्टारंगशेट्टी विजयी

५. चिक्कनायकनहल्ली विधानसभा मतदार संघ
जे. सी. मधुस्वामी पराभूत, सुरेश बाबू विजयी

६. बायलागी विधानसभा मतदार संघ
मुरुगेश निरानी पराभूत, जे. टी. पाटील विजयी

७. हिरेकेरुरु विधानसभा मतदार संघ
बी. सी. पाटील पराभूत, यूबी बनकर विजयी

८. चिक्काबल्लापूर विधानसभा मतदार संघ
डॉ. के. सुधाकर पराभूत, प्रदीप ईश्वर विजयी

९. होसकोटे विधानसभा मतदार संघ
एम.टी.बी. नागराज पराभूत, शरत बचेगौडा विजयी

१०. के. आर. पेट विधानसभा मतदार संघ
नारायणगौडा पराभूत, एच.टी. मंजू विजयी

११. तिपातूर विधानसभा मतदार संघ
बी. सी. नागेश पराभूत, के. शदाक्षरी विजयी

१२. येलबुर्गा विधानसभा मतदार संघ
हलप्पा अचार पराभूत, बसवराज रायरेड्डी विजयी

१३. नवलगुंडा विधानसभा मतदार संघ
शंकर मुनेकोप्पा पराभूत, एनएच कोनरेड्डी विजयी

तर धारवाड-हुबळी मध्य मधून भाजपामधून काँग्रेसमध्ये गेलेले जगदीश शेट्टार यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *