लोकसभा निवडणूकीत घवघवीत यश मिळविणाऱ्या महाविकास आघाडीला चार महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणूकीत मात्र शंका उपस्थित व्हाव्यात इतक्या कमी जागांवर विजय मिळाला. त्यातच सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाजपा महायुतीला मिळालेल्या जागांवरून तर्क वितर्क लढवित निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि भाजपाच्या विजयावर संशय व्यक्त करण्यात येऊ लागला. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्ये डॉ बाबा आढाव यांनी ईव्हीएम मशिनच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरु केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी डॉ बाबा आढाव यांच्या आंदोलनाच्या स्थळी भेट देत ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. आम्हाला त्यांच्या कारभारात लक्ष्य आणि ढवळाढवळ करता येत नाही.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मला बाबा आढाव यांना सांगायच आहे. काही गोष्टी या निवडणूक आयोगाशी संबधित असतात, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. तर काही गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येतात. त्यात आम्हाला ढवळाढवळ करता येत नाही. त्यांना जो निर्णय योग्य वाटतो तो निर्णय त्यांनी दिला. मी बारामतीतून उभा होतो. मी पाहिलं की, संध्याकाळी साडेपाच नंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढली. तसेच वेगवेगळ्या मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की, सहा वाजेपर्यंत जेवढे मतदार येतील त्या सर्वांसाठी व्यवस्था करा आणि त्या सर्वांना मतदान करता येईल याची काळजी घ्यावी असे सांगितले.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणूकीच्या वेळी महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. तर आमच्या केवळ १७ जागा निवडूण आल्या. आम्ही तो पराभव मान्य केला. कारण तो जनतेचा कौल होता. परंतु पुन्हा कोणीच ईव्हीएम मशिन्सवरून प्रशन केला नाही. माझ्या बारामती मतदारसंघात माझा उमेदवार ४८ मतांनी पराभूत झाला. मात्र मी त्याच मतदारसंघात विधानसभा निवडणूकीत १ लाखाच्या मताधिक्याने निवडूण आलो. कारण बारामती करांच आधीच ठरलेलं आहे की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा अर्थात मी. त्यानुसारच बारामतीकर मतदान करतात. विधानसभेला ज्या गावातून मतदान झालं नाही त्या गावातून विधानसभा निवडणूकीत भरभरून मिळल्याचं सांगत पाच महिन्यात जनतेला कौल बदलला त्याला आम्ही काय करणार असेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना अजित पवार म्हणाले की, १९९९ च्या निवडणूकीत बारामतीकरांनी शरद पवार यांना ८५ हजार मतांनी विजयी केलं होते. मला त्यावेळी ५० हजार मतांची आघाडी मिळाली होती. पण त्यावेळी निवडणूक प्रणालीवर संशय व्यक्त केला नव्हता असेही यावेळी सांगितले.