Breaking News

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, दमानियांनीं दिलेली कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटलो पण… चौकशी झाल्यानंतर पुढे काय येते त्यानंतर पुढील निर्णय

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अनेक जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चे निघत आहेत. त्यातच या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या आर्थिक संबधाचा पर्दाफाश सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. तसेच संतोष हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अंजली दमानिया यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा उपस्थित करत धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाची मागणीही केली. या प्रश्नी अंजली दमानिया यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यासंबधीची कागदपत्रेही दिली. यासंदर्भात अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, अंजली दमानिया यांनी दिलेली कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटल्याचे सांगितले.

यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, दावोसवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच आलेले आहेत. तसेच त्यांना मी भेटण्यासाठी मी जाणार होतो. मात्र मुख्यमंत्री फडणवीस हे आजच नागपूरला संध्याकाळच्या विमानाने जाणार होते. त्यामुळे त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अॅण्टी चेंबरमध्ये चर्चेसाठी बोलावले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, अंजली दमानियांनी उपस्थित केलेल्या काही मुद्यांची कागदपत्रे त्यांनी भेटून मला दिली. ती कागदपत्रे घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, याच संदर्भात अंजली दमानिया यांनीही त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सध्या तीन वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून तपास सुरु आहे. त्या तपास यंत्रणांकडून संपूर्ण चौकशीनंतर या विषयी अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या विषयावर पुढील निर्णय घेऊ असे सांगितल्याचेही यावेळी बोलताना सांगितले.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात जे काही विविध माहिती सूत्रांच्या माध्यमातून पुढे येत आहे, त्या सूत्राचे नाव तरी सांगा जेणेकरून त्या सूत्राकडून तुमच्या माध्यमातून माहिती पुढे येत असते त्यांचा आम्ही सत्कार करू असेही यावेळी खोचकपणे प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *