Breaking News

इम्तियाज जलील यांचा राऊतांना टोला, शिवाजी आणि संभाजी महाराज हे तुमची मक्तेदारी नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवरून सुणावले

राज्यातील आगामी निवडणूकांच्यादृष्टीने एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने या प्रस्तावाला झिडकारले. त्यावरून इम्तियाज जलील यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना चांगलेच सुनावत म्हणाले की, भारतात आणि महाराष्ट्रात राहणारा मुस्लिम समाज छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा आपले आदर्श मानतो. त्यामुळे त्यांची मक्तेदारी तुम्ही विसरून जा असा टोला लगावत तुम्ही फक्त राजकिय फायद्यासाठी शिवाजी महाराजांचा उपयोग करता. औरंगजेबाचा काळ कोणता आजचा काळ कोणता असे प्रत्युत्तर देत जरा नीट लक्षात घ्या असा चिमटाही काढला.  
इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर देऊन राजकीय वर्तुळात चर्चेची राळ उडवून दिली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी ही ऑफर धुडकावून लावत म्हणाले की, महाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार आहे आणि तेच राहील. यात चौथा कोण पाचवा कोण यामध्ये तुम्ही कशाला पडता? शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारांनी चालणारे पक्ष आहेत. हेच आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या पुढे कबरीपुढे जाऊन गुढघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना जलील यांनी टोला लगावला.

ज्या शिवसेनेचा जन्म काँग्रेसच्या विरोधात झाला होता, ती शिवसेना फक्त सत्ता उपभोगण्यासाठी पुन्हा त्यांच्यासोबतच जाऊ शकते, तर तुम्ही किती खालच्या पातळीवर गेला आहात, हे दिसतेय. तुम्ही आम्हाला असा उपदेश देणार असाल, तर लोकांनाही कळाले आहे की छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. आम्ही छत्रपतींच्या नावाचा वापर कधीही आपल्या राजकीय स्वार्थासाठी केलेला नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.

भाजपाच्या पराभवासाठी एमआयएम कोणत्याही पक्षासोबत युती करायला तयार असून देशात भाजपा ज्या पद्धतीने वागतेय, त्याचे घातक परिणाम देशात सुरू आहेत. सामान्य लोकांचा रोजगार, महागाईचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणीही काहीही बोलायला तयार नाही. चित्रपट कसा चालू आहे, चित्रपटात काय दाखवण्यात आले आहे यावर चर्चा सुरू आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी आम्हाला कोणत्याही पक्षासोबत जायला लागलं, तरी आम्ही जाऊ असे त्यांनी सांगितले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *