Breaking News

एमआयएमचे जलील म्हणाले, आघाडीसाठी मी उध्दव ठाकरेंना भेटणार महाआघाडीत येण्याबाबतच्या प्रस्तावावर जलील यांनी पुन्हा मांडली भूमिका

राज्यातील एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी काल काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेला आघाडीत सहभागी करून घ्या म्हणून प्रस्ताव दिल्यानंतर आज त्यांनी याप्रश्नी आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे वक्तव्य करत आणखी एकदा राळ उडवून दिली.

महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबतचा प्रस्ताव एमआयएमने दिल्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत एमआयएमशी युती होवू शकत नसल्याचे स्पष्ट केले.

तरीही आज इम्तियाझ जलिल यांनी महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबतचा प्रस्ताव शिवसेनेला देत. याप्रश्नी आपण लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

तसेच आम्ही धर्मनिरपेक्ष विचाराचा पक्ष असलेली माणसे असून भाजपाच्या पराभवासाठी आम्ही युती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पण ते लोक म्हणतायत आम्ही धर्मनिरपेक्ष नाही म्हणून मला कळेना आता मी त्यांना आम्ही धर्मनिरपेक्ष असल्याचे प्रमाणपत्र कुठून आणून दाखवू. ते कुठे मिळते का? असा उपरोधिक सवालही त्यांनी यावेळी केला.

काल जलील यांनी युती करण्याबाबतचा प्रस्ताव काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचेही जाहीर केले. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून संयमी भूमिका मांडत एमआयएमच्या भूमिकेची तपासणी आणि त्यांनी पाठविलेल्या युतीचा प्रस्ताव समजून घेतल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेवू असे सांगत युती करणार की नाही याबाबत स्पष्ट बोलण्याचे टाळले.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी इम्तियाझ जलील यांनी दिलेल्या एमआयएमसोबतच्या युतीचा प्रस्ताव आज स्पष्ट शब्दात फेटाळून लावला. तत्पूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना जलील यांनी वरील भूमिका जाहीर केली होती.

Check Also

वेदांतावरून आदित्य ठाकरे म्हणाले, स्वतःसाठी खोके अन महाराष्ट्राला धोके महाराष्ट्रातून गेली गुजरातला जाण्यावरून साधला शिंदे सरकारवर निशाणा

मागील दिड वर्षापासून महाराष्ट्रात फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प सुरु करण्याच्या अनुषंगाने सातत्याने राज्य सरकारकडून चर्चेच्या फेऱ्या सुरु …

Leave a Reply

Your email address will not be published.