Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट, भेटीनंतर म्हणाले… कोणतीही राजकिय चर्चा झाली नाही पण भुतकाळातील

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडाचे निशाण फडकावित भाजपाच्या मदतीने राज्यात सरकारही स्थापन केले. उशीराने का होईना, अखेर राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थिरस्थावर होत आहे. मात्र आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीचे वारे वाहू लागले. त्यामुळे राजकिय क्षेत्रातील नव्या समीकरणांचे वारे वाहू लागले आहेत. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या निवासस्थानी जावून भेट घेतली.

गणरायाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांनी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात असलं, तरी त्यातून युतीबाबतची राजकीय चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले, राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मी यापूर्वीच येणार होतो. मात्र आता गणपती उस्तवामुळे सर्वांचीच भेट घेतोय असे सांगितले.

राज ठाकरे यांच्याबरोबरच्या भेटीत काय चर्चा झाली असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले की, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. सगळीकडे गणपतीचं आगमन झालं आहे. उत्साहाचं वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांकडे जात असतो. त्यामुळे आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंकडे आलो आहे. ही सदिच्छा भेट होती. त्यांचं मध्यंतरी ऑपरेशन झालं होतं प्रकृतीची विचारपूस आणि गणपती दर्शन यासाठी मी आलो होतो. राजकीय चर्चाच झाली नाही. त्यामुळे कोणती समीकरणं यातून निघणार? असा प्रतिप्रश्नही केला.

दरम्यान, या भेटीमध्ये जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना आठवणींविषयी विचारणा केली असता त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला. मी राज ठाकरेंचं ऑपरेशन झालं, तेव्हाच येणार होतो. पण आज गणपतीचा योगायोग होता. त्यांच्या गणपतीचं आजच विसर्जन आहे. त्यामुळे मी आलो. दिघे साहेबांच्या आठवणी देखील चर्चेतून निघाल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बाळासाहेबांच्या सानिध्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी काम केलं असल्याचे आवर्जून सांगितले.

Check Also

राज ठाकरे-अमित शाह भेट होणार का? फडणवीस यांनी दिले ‘हे’ संकेत आयत्या वेळी होवू शकते भेट

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published.