येत्या २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप स्वतः च्या बळावर सत्ता स्थापन करेल असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केला.
देशात भाजपची शक्ती वाढली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सकारात्मक दृष्टीकोन आहे. त्यांच्या नेतृत्वात आणि टिम गोवा भाजपाच्या मेहनतीमुळेच गोव्यात भाजपाची एक हाती सत्ता आली आहे. त्यांच्यावतीनेच मी आज हा सत्कार स्विकारत असल्याचे ते म्हणाले.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आज नागपुरात जोरदार स्वागत करण्यात आले आहे. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपाने उत्तम कामगिरी करत ४ राज्यांमध्ये आपली सत्ता कायम ठेवली. यापैकी गोव्यात फडणवीस निवडणूक प्रभारी होते. त्यांच्या नेतृत्वात भाजपाने एकहाती विजय खेचून आणला त्यामुळे भाजपा नेत्यांकडून सध्या त्यांचे जोरदार कौतुक केले जातेय.
गोव्यातील या विजयानंतर फडणवीस आज पहिल्यांदा नागपुरात आले. यावेळी विमानतळ ते नितीन गडकरीचे यांच्या घरापर्यंत अशी रॅली काढून जल्लोष साजरा करण्यात आला. फडणवीसांच्या स्वागतासाठी विमानतळावर ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी नागपूर विमानतळावर मोठी गर्दी केली होती.
यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, भाजपावर दिवसेंदिवस लोकांचा विश्वास वाढत आहे. राज्यातही भाजपाच्या कामावर लोकं आनंदी आहेत. त्यामुळे आगामी निवडणूकीत राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले.
गोव्याचे प्रभारी तथा राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला एकहाती सत्ता मिळवून दिली. त्यानंतर नागपूरात फडणवीस हे पहिल्यांदाच नागपूरात येत असल्याने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
गोव्यासह इतर तीन राज्यांत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयाबद्दल भाजप, नागपूर महानगरच्या वतीने आयोजित विजयोत्सव आणि अभिनंदन सोहळ्याची क्षणचित्रे. @Dev_Fadnavis @cbawankule @PravinDatke @BJP4Maharashtra pic.twitter.com/1rZqb6gFXJ
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 17, 2022